🕒 1 min read
मुंबई : चंदेरी दुनियेच्या झगमगाटात अनेक काळी गुपितं दडलेली असतात, याचा धक्कादायक प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. पडद्यावर हिरो बनून वावरणाऱ्या एका अभिनेत्याचा खरा चेहरा समोर आल्याने बॉलिवूड (Bollywood) विश्वात एकच खळबळ उडाली आहे. ‘धुरंधर’ (Dhurandar) या गाजलेल्या चित्रपटात महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या नदीम खान (Nadeem Khan) या अभिनेत्याला मालवणी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर स्वतःच्याच घरात काम करणाऱ्या महिलेवर बलात्कार केल्याचा गंभीर आरोप आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण अत्यंत संतापजनक आहे. पीडित महिला नदीम खानच्या घरी घरकाम करत होती. या दरम्यान नदीमने तिचा विश्वास संपादन केला. “तुझ्याशी लग्न करेन,” असं खोटं आश्वासन देऊन त्याने २०१५ पासून तिचा शारीरिक वापर सुरू केला. तब्बल १० वर्षे हा नराधम तिचा लैंगिक छळ करत होता. जेव्हा पीडितेने लग्नासाठी तगादा लावला, तेव्हा नदीमने स्पष्ट नकार दिला आणि तिचा मानसिक छळ करण्यास सुरुवात केली.
Nadeem Khan Arrested
सुरुवातीला भीतीपोटी ही महिला गप्प राहिली, पण अन्यायाची सीमा ओलांडल्यानंतर तिने धाडसाने मालवणी पोलीस ठाणे (Malvani Police Station) गाठले. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ हालचाली करत नदीम खान विरोधात गुन्हा दाखल केला आणि त्याला अटक केली. या घटनेमुळे सिनेसृष्टीतील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. नदीमने अशा प्रकारे आणखी किती महिलांची फसवणूक केली आहे? याचा तपास आता पोलीस करत आहेत. या अटकेमुळे सिनेसृष्टीतील अनेक बड्या लोकांचे धाबे दणाणले आहेत.
📌 महत्वाच्या बातम्या
- IND vs NZ : अवघ्या 10 ओव्हरमध्ये खेळ खल्लास! अभिषेक शर्माचं वादळ; न्यूझीलंडचा लाजीरवाणा पराभव
- ‘ही ICC नाही, तर इंडियन क्रिकेट काऊन्सिल!’; पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या माजी अध्यक्षांचा थेट भारतावर वार
- भारतावर रशियन तेल खरेदीमुळं लादलेलं 25 टक्के टॅरिफ रद्द होणार? अमेरिकेकडून मोठे संकेत!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










