Share

भारतावर रशियन तेल खरेदीमुळं लादलेलं 25 टक्के टॅरिफ रद्द होणार? अमेरिकेकडून मोठे संकेत!

भारताने रशियन तेलाची खरेदी कमी केल्याने अमेरिकेने भारतावर लादलेला २५ टक्के अतिरिक्त टॅरिफ रद्द करण्याचे संकेत दिले आहेत. ट्रम्प प्रशासनाने याचे स्वागत केले आहे.

Published On: 

भारतावर रशियन तेल खरेदीमुळं लादलेलं 25 टक्के टॅरिफ रद्द होणार? अमेरिकेकडून मोठे संकेत!

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा स्वभाव आणि त्यांचे निर्णय कधी काय वळण घेतील, याचा अंदाज भल्याभल्यांना लावता येत नाही. पण सध्या भारतासाठी वॉशिंग्टनमधून एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे. रशियाकडून तेल (Russian Oil) खरेदी केल्याच्या रागातून अमेरिकेने भारतावर लादलेला अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ (Tariff) लवकरच रद्द होण्याची दाट शक्यता आहे.

US Tariff on India Russian Oil

रशिया-युक्रेन युद्धाच्या काळात भारताने रशियाकडून स्वस्त दरात कच्चे तेल (Crude Oil) खरेदी करण्यास पसंती दिली होती. यामुळे संतापलेल्या ट्रम्प प्रशासनाने भारतावर ५० टक्के (मूळ २५% + रशियन तेलामुळे अतिरिक्त २५%) आयात शुल्क लादले होते. मात्र, आता भारताने रशियन तेलाची खरेदी कमी केल्याने अमेरिकेचा सूर नरमल्याचे दिसत आहे.

अमेरिकेचे ट्रेजरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट यांनी याबाबत महत्त्वाचे विधान केले. ते म्हणाले, “भारताने आता रशियन क्रूड ऑईलची खरेदी जवळपास थांबवली आहे. त्यामुळे रशियन तेलाच्या कारणास्तव लादलेला २५ टक्के अतिरिक्त टॅरिफ हटवण्याचा मार्ग आता मोकळा होऊ शकतो.” हे ट्रम्प प्रशासनाच्या दडपण तंत्राचे यश असल्याचेही त्यांनी बोलून दाखवले.

यावेळी बेसेंट यांनी युरोपियन देशांच्या दुटप्पीपणावरही बोट ठेवलं. युरोप रशियाला विरोध करण्याच्या गप्पा मारतो, पण भारताने रशियन तेलापासून बनवलेले रिफाईंड प्रॉडक्ट्स (पेट्रोल-डिझेल) मात्र युरोपियन देशच विकत घेतात, असा टोला त्यांनी लगावला. भारतीय रिफायनरीज आता रशियाऐवजी पश्चिम आशिया आणि आफ्रिकेकडून तेल घेत असल्याने अमेरिका हा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही