प्रतिनिधी, 10 नोव्हेंबर: ऐन दिवाळीत एका अनपेक्षित भेटीमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. शिंदे गटातील मंत्री प्रताप सरनाईक यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची अचानक भेट घेतली. शिवसेना फुटीनंतर या दोन नेत्यांमध्ये झालेल्या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
शिवसेना फुटल्यापासून दोन्ही गटांमध्ये मोठा दुरावा निर्माण झाला असून दोन्ही बाजूंच्या नेत्यांकडून एकमेकांवर कठोर शब्दांत टीका केली जाते. निवडणुकांच्या मैदानासह दसरा मेळाव्यातही उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्याकडून एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप झाले होते. या तीव्र संघर्षाच्या पार्श्वभूमीवर दुरावलेले नेते दिवाळीनिमित्त एकत्र आल्याने सुरुवातीला या भेटीचे कारण गुलदस्त्यात होते.
मात्र, या भेटीवर संजय राऊत यांनी स्वतः भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले, “मी घराच्या खाली आल्यावर प्रताप सरनाईक आल्याचे कळाले. मी त्यांना भेटायला जाईन. आमचे व्यक्तिगत संबंध असून त्यांच्या आणि माझ्या आईचे अनेक वर्षांपासून जिव्हाळ्याचे नाते आहे.”
या भेटीमागे कोणताही राजकीय हेतू नसल्याचे स्पष्ट करताना राऊत पुढे म्हणाले, “दिवाळीचा सण असल्याने ते येणारच, यामागे कोणतेही संकेत नाहीत. ते येतील, त्यांना आवडणारे लाडू, चकली खातील आणि आईचा आशीर्वाद घेऊन निघून जातील. त्यापलीकडे काही नाही.” तसेच, शिवसेनेच्या विलीनीकरणाबाबत काहीही नसल्याचे सांगत, “शिंदे गटात दोन शिंदे आहेत, तो तुम्ही शोधा,” असेही ते शेवटी म्हणाले.
📌 महत्वाच्या बातम्या
- “विराटशी बोलताना आरशात पाहिल्यासारखं वाटलं” : निवृत्तीबाबत केन विल्यमसनचा मोठा खुलासा
- “१०० टक्के खरं”: सँडपेपरगेट प्रकरणी डेव्हिड वॉर्नरचा उस्मान ख्वाजाच्या दाव्यांना पाठिंबा
- मुशफिकुर रहीमने रचला इतिहास; कसोटी क्रिकेटमध्ये ७,००० धावा करणारा ठरला पहिला बांगलादेशी
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








