देशातील ‘रावणलीला’ संपवण्यासाठी रामलीला मैदानावर आंदोलन : संजय राऊतांचा घणाघात

खासदार संजय राऊत यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत निवडणूक आयोग आणि भाजपवर जोरदार टीका करत देशातील रावणलीला संपवण्यासाठी रामलीला मैदानावर आंदोलन पुकारल्याचे स्पष्ट केले.

Published On: 

Sanjay Raut

दिल्ली, 1 नोव्हेंबर: खासदार संजय राऊत यांनी दिल्ली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सत्ताधारी भाजप, निवडणूक आयोग आणि विरोधी नेत्यांवर सडकून टीका केली. दिल्लीतील रामलीला मैदानावरील आंदोलनामागची भूमिका स्पष्ट करताना त्यांनी, “देशात सुरू असलेली रावणलीला संपवण्यासाठी आम्ही सर्व रामाचे सैनिक एकत्र आलो आहोत,” असा घणाघात केला.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावरही राऊत यांनी जोरदार निशाणा साधला. “मॉक पार्लमेंटमध्ये जनतेने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या हकालपट्टीचा निर्णय घेतला असून, नैतिकदृष्ट्या त्यांना आता या पदावर राहण्याचा अधिकार नाही,” असे त्यांनी (Sanjay Raut) स्पष्ट केले.

राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याला उत्तर देताना राऊत म्हणाले की, “बाळासाहेब ठाकरे हे माझे दैवत आणि शिक्षक आहेत. त्यांनीच मला लेखणी धरून लिहायला शिकवले. त्यामुळे ते माझ्यावर चिडले तरी तो माझा आशीर्वाद आणि गौरवच आहे.”

याशिवाय, ठाण्यात घडलेल्या राम पुर्णेकर प्रकरणावरून राऊत यांनी ठाणे पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र संताप व्यक्त केला. या प्रकरणात आंदोलकांना मारहाण करणाऱ्या पोलिसांवरच कठोर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी त्यांनी केली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही