प्रतिनिधी, 1 नोव्हेंबर: संजय राऊत यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात भाजप आमदार नितेश राणे यांना न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. सुनावणीसाठी गैरहजर राहिल्याने माझगाव न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध थेट वॉरंट जारी केले आहे.
नितेश राणे यांनी, “संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत,” असे वक्तव्य केले होते. या विधानामुळे आपली बदनामी झाल्याचा दावा करत संजय राऊत यांनी नितेश राणेंविरोधात माझगाव न्यायालयात मानहानीची याचिका दाखल केली होती.
या याचिकेवर वारंवार सुनावणी होऊनही नितेश राणे न्यायालयात उपस्थित राहिले नाहीत. परिणामी, न्यायालयाने त्यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानाच्या पत्त्यावर हे वॉरंट पाठवले असून, यामुळे त्यांच्या कायदेशीर अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- कोण आहेत निधी राझदान? मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांशी विवाह केल्याने आल्या चर्चेत
- दारूच्या प्रत्येक बाटलीवर १० रुपये अतिरिक्त आकारणार; रिकामी बाटली दिल्यास मिळणार परतावा
- बांगलादेश विरुद्ध वेस्ट इंडिज कसोटीनंतरची WTC गुणतालिका: वेस्ट इंडिजचा ८ गडी राखून विजय
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.







