Share

पंकजा मुंडेंची ‘ती’ इच्छा अखेर पूर्ण; रोहित शर्मालाही डॉक्टरेट, पुण्यात दोघांचा मोठा सन्मान!

पुण्यात पंकजा मुंडे आणि रोहित शर्मा यांना मानद डॉक्टरेट पदवीने सन्मानित करण्यात आले. यावेळी पंकजा मुंडेंनी आपली पीएचडीची अपूर्ण इच्छा पूर्ण झाल्याचे सांगितले.

Published On: 

Pankaja Munde & Rohit Sharma: पंकजा मुंडे, रोहित शर्माला डॉक्टरेट; पुण्यात मोठा सन्मान!

राजकारणातील धडाडीचं नेतृत्व आणि क्रिकेटच्या मैदानावरील ‘हिटमॅन’ एकाच वेळी डॉक्टर झाले तर? होय, असाच काहीसा खास योग पुण्यात जुळून आला आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा यांना पुण्यात प्रतिष्ठित मानद डॉक्टरेट पदवीने सन्मानित करण्यात आल्याने सर्वत्र कौतुक होत आहे.

पुण्यातील लोहगाव येथील अजिंक्य डी.वाय. पाटील विद्यापीठाचा (ADYPU) १० वा दीक्षांत समारंभ शनिवारी मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल पंकजा मुंडे यांना, तर क्रीडा क्षेत्रातील अतुलनीय कामगिरीसाठी रोहित शर्माला मानद डॉक्टरेट (D.Litt) प्रदान करण्यात आली. यावेळी बोलताना पंकजा मुंडे काहीशा भावूक झालेल्या दिसल्या.

Pankaja Munde & Rohit Sharma

“मला पीएचडी मिळावी, ही माझी खूप जुनी इच्छा होती आणि नेमकी त्याच वेळेस हा सन्मान मिळाला आहे,” अशा शब्दांत पंकजा यांनी आपला आनंद व्यक्त केला. आपल्या भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना भाषेची गंमतही केली. “मी मराठीत बोलू की हिंदीत? की इंग्रजीत? चला, मी खिचडी भाषेत बोलते,” असं म्हणताच सभागृहात एकच हंशा पिकला.

तरुणांना सल्ला देताना त्या म्हणाल्या, “पैसे कमवल्याने फक्त इगो सॅटिस्फाय होतो, पण तुम्हाला आनंदी व्हायचं असेल तर पॉझिटिव्ह राहायला शिका.” ‘ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे’ हा मंत्रही त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला.

या सोहळ्यात केवळ पंकजा मुंडे आणि रोहित शर्माच नाही, तर इतर क्षेत्रातील दिग्गजांनाही गौरवण्यात आले. यामध्ये उज्जैनचे गुरुजी प्रमोद शर्मा (सेवा), सनातन धर्म फाऊंडेशनचे सुदेश अग्रवाल (सांस्कृतिक), रेशेश भन्साळी (उद्योग) आणि मनोज पोचट यांचा समावेश होता. अभिनेत्री विद्या माळवदे हिने या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही