प्रतिनिधी, 10 ऑक्टोबर: भारतीय वंशाच्या असलेल्या आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाच्या (ICC Navi Pillay) माजी न्यायाधीश नवी पिल्लई यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. या निर्णयानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. आपण आठ युद्धे थांबवली असल्याचा दावा करत ट्रम्प यांनी या पुरस्कारावर आपली दावेदारी सांगितली होती. मात्र, नोबेल समितीने त्यांना पुन्हा एकदा डावलले आहे.
नवी पिल्लई यांना हा पुरस्कार जाहीर होताच अवघ्या काही तासांत ट्रम्प यांनी मोठी घोषणा करत थेट आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयावर निर्बंध लादले. या न्यायालयाने आपल्या मर्यादा ओलांडल्यास त्यांना भयंकर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा थेट इशाराही ट्रम्प यांनी दिला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी आयसीसीवर जोरदार टीका केली आहे. हे न्यायालय स्वतंत्र नसून ते कायद्याचे उल्लंघन करत असल्याचे ट्रम्प म्हणाले. ज्या देशांनी एकत्र येऊन या न्यायालयाची स्थापना केली, त्यांचेच हित यात जपले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
दुसरीकडे ट्रम्प यांनी नॉर्वेवरही आपला राग काढला आहे. नोबेल समितीचा हा निर्णय लाजिरवाणा असून यामुळे नॉर्वेची प्रतिमा डागाळली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हा डाग लवकर पुसला जाणार नाही आणि आम्ही नॉर्वेचा हा निर्णय कधीही विसरणार नाही, असे ट्रम्प म्हणाले. पिल्लई यांच्याबद्दल बोलताना ट्रम्प यांनी सांगितले की, आपण यापूर्वी त्यांचे नाव कधीही ऐकले नव्हते. तसेच यावेळी त्यांनी आपण आठ युद्धे थांबवल्याचा दावा पुन्हा बोलून दाखवला.
📌 महत्वाच्या बातम्या
- सरकार सध्या गुंडगिरीच्या भूमिकेत; दिल्ली-मुंबईत आंदोलकांची धरपकड, अभिजीत दिपकेंना अटक, जरांगे पाटील संतापले
- मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी CJP चे आंदोलन; दीपके अटकेत, पण ‘प्लॅन बी’ने पोलिसांना दिला धप्पा
- CJP चे दिल्लीतील आंदोलन चिघळले; दगडफेकीत दोन पोलीस जखमी, केजरीवाल आणि ममता बॅनर्जींसह १००० जण ताब्यात
Ask Maharashtra Desha
आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.









