Share

CJP चे दिल्लीतील आंदोलन चिघळले; दगडफेकीत दोन पोलीस जखमी, केजरीवाल आणि ममता बॅनर्जींसह १००० जण ताब्यात

CJP च्या दिल्लीतील आंदोलनादरम्यान पोलिसांवर दगडफेक; अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जींसह अनेक बडे नेते आणि सुमारे १००० आंदोलक पोलिसांच्या ताब्यात.

Published On: 

Delhi Protest CJP leaders including Arvind Kejriwal and Mamata Banerjee detained by police

नवी दिल्ली, 10 ऑक्टोबर: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात कॉक्रोच जनता पार्टीने (CJP Protest) पुकारलेल्या आंदोलनाला दिल्लीत हिंसक वळण लागले आहे. शनिवारी जंतर-मंतरकडे जाणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी रोखल्यानंतर मोठा गदारोळ झाला. पोलिसांनी कारवाई करत दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह अनेक बड्या नेत्यांना ताब्यात घेतले आहे. आकाशवाणी भवनाजवळ आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले असून, देशभरातील सुमारे १००० आंदोलकांना आतापर्यंत ताब्यात घेण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारली असतानाही नेते आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना त्यांच्या घराबाहेरूनच ताब्यात घेण्यात आले. ‘देशातील तरुण जागा झाला आहे’, अशी प्रतिक्रिया केजरीवाल यांनी या कारवाईनंतर दिली. दुसरीकडे, साऊथ अव्हेन्यू परिसरातील एका बस थांब्यावरून तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्यासोबत तृणमूलचे नेते डेरेक ओब्रायन आणि डोला सेन यांच्यावरही पोलिसांकडून कारवाई करण्यात आली.

दुपारच्या सुमारास आकाशवाणी भवनाजवळील इम्तियाज अली मार्गावर आंदोलनाला हिंसक वळण लागले. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, २५ ते ३० जणांच्या जमावाने बॅरिकेड्स तोडून सुरक्षा दलांवर दगडफेक केली. या घटनेत दोन पोलीस जखमी झाले आहेत. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, दिल्ली पोलिसांनी कॅनॉट प्लेस, मिंटो ब्रिज, रिगल सिनेमा आणि आकाशवाणी भवन परिसरातून सुमारे हजार जणांना ताब्यात घेतले आहे. याशिवाय, राजधानीतील १५ पोलीस जिल्ह्यांमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

आयएनए मार्केटजवळून सफदरजंग फ्लायओव्हरच्या दिशेने कूच करणाऱ्या आयसाच्या (AISA) अध्यक्षा नेहा बोरा, सीपीआय (ML) लिबरेशनचे सरचिटणीस दीपंकर भट्टाचार्य, प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. ‘मला ताब्यात घेतले असले तरी आंदोलन थांबलेले नाही, हा आमच्या पिढीचा १९४२ चा लढा आहे’, असे नेहा बोरा यांनी ‘एक्स’वर म्हटले आहे. तर, कडेकोट बंदोबस्त असतानाही ठिकठिकाणी ‘जंतर-मंतर २.०’ उभारण्यात यश आल्याचा दावा योगेंद्र यादव यांनी केला असून, त्यांच्यासोबत शादान फरासत आणि ५०० तरुण असल्याचे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.

या कारवाईवरून विरोधकांनी केंद्र सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. केरळचे माजी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी फेसबुकवर पोस्ट करत, ‘केंद्राने सशस्त्र दलांच्या मदतीने दिल्लीचे रूपांतर खुल्या तुरुंगात केले असून, मतदानाचा अधिकार कमकुवत करण्याचा हा कट आहे’, असा आरोप केला. सीपीएम नेते पी. राजीव यांनी पोलिसांच्या वाहनातून व्हिडीओ शेअर करत लोकशाही वाचवण्याचा हा लढा अधिक तीव्र करण्याचे आवाहन केले. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजधानीत पोलिसांसह निमलष्करी दले तैनात करण्यात आली असून, ड्रोनद्वारे निगराणी ठेवली जात आहे. सुरक्षेच्या कारणास्तव नवी दिल्लीकडे जाणारे रस्ते, काही मेट्रो स्थानके आणि दोन प्रमुख रेल्वे स्थानके बंद करण्यात आल्याने वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही