Share

आजीच्या अंत्यसंस्काराला जायचं की आंदोलनात राहायचं? दिल्ली पोलिसांचा अभिजीत दीपकेसमोर पर्याय

सीजेपीच्या आंदोलनासाठी दिल्लीत दाखल झालेल्या अभिजीत दीपके यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. यादरम्यान त्यांच्या आजीचं निधन झाल्याने पोलिसांनी त्यांना अंत्यसंस्काराला जाण्याचा पर्याय दिला आहे.

Published On: 

Abhijit Dipke on BJP

नवी दिल्ली, 10 ऑक्टोबर: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी दिल्लीत पोहोचलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या (सीजेपी) नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, सीजेपीचे नेते अभिजीत दीपके (Abhijeet Dipke) यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या आजीचे निधन झाल्याची बातमी आली. यानंतर, पोलिसांच्या ताब्यातच राहायचे की आजीच्या अंत्यसंस्काराला जायचे, याचा निर्णय घेण्याचा पर्याय दिल्ली पोलिसांनी दीपके यांच्यासमोर ठेवला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अभिजीत दीपके यांच्या ८५ वर्षीय आजी सावित्रीबाई शंकरराव दीपके या गेल्या महिनाभरापासून आजारी होत्या. त्यांच्यावर हिंगोलीत उपचार सुरू असताना आज सकाळी साडेअकराच्या सुमारास संतूक पिंपरी गावात त्यांचे निधन झाले. एएनआय या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, दिल्ली पोलिसांनी दीपके यांना आजीच्या निधनाची माहिती दिली आणि अंत्यसंस्कारासाठी गावी जाण्याची किंवा दिल्लीत पोलिसांच्या ताब्यात आंदोलन सुरू ठेवण्याची निवड त्यांना स्वतः करायला सांगितली.

‘एसआयआर’मधील अनियमिततेचा आरोप करत सीजेपीने ‘जंतरमंतर २.०’ ची हाक दिली होती. मात्र, पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली. मुंबईहून विमानाने दिल्ली विमानतळावर दाखल होताच अभिजीत दीपके यांच्यासह सौरव दास आणि आशुतोष रांका यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आपल्या अटकेनंतर आता सीजेपीचे नेतृत्व अजिंक्य शिंदे करणार असल्याची घोषणा दीपके यांनी केली आहे. दिल्लीबरोबरच मुंबई आणि पुण्यातही आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत.

या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजधानीत कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. ३० हजारांहून अधिक पोलीस आणि निमलष्करी दलाचे जवान तैनात असून, २० डिटेन्शन सेंटर्स उभारण्यात आली आहेत. तसेच, खबरदारीचा उपाय म्हणून दिल्लीकडे येणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. दिल्लीतील ४५ मेट्रो स्थानके बंद करण्यात आली असून, मध्य दिल्लीतील कर्तव्यपथ आणि जनपथ परिसरातील ४ किलोमीटर परिघात २४ तासांसाठी इंटरनेट सेवाही खंडित करण्यात आली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही