भाजपला आजवरचा सर्वात मोठा झटका, अर्थमंत्री सीतारमण यांचे पती पराकला प्रभाकर दीपकेंच्या आंदोलनात सामील

‘एसआयआर’ रद्द करण्याच्या मागणीसाठी अभिजीत दीपके आणि प्रकाश राज यांच्या आंदोलनात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती पराकला प्रभाकर सहभागी होणार आहेत.

Published On: 

Parakala Prabhakar and Abhijeet Dipke protest against SIR

प्रतिनिधी, 22 ऑक्टोबर: भाजपला मोठा राजकीय धक्का बसला असून, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती आणि प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ पराकला प्रभाकर (Abhijeet Dipke) हे सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरणार आहेत. ‘एसआयआर’ (SIR) रद्द करण्याच्या मागणीसाठी सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी पुकारलेल्या आंदोलनात प्रभाकर खांद्याला खांदा लावून सहभागी होणार आहेत. येत्या २३ ऑक्टोबर रोजी एका मंचावर प्रभाकर यांच्यासोबत अभिनेते प्रकाश राज आणि दीपके उपस्थित दिसणार आहेत.

‘पीपल अगेन्स्ट एसआयआर’ या संघटनेकडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये अनेक राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि प्रसिद्ध व्यक्ती सहभागी होणार आहेत. या मंचावरून ‘एसआयआर’ तत्काळ रद्द करण्याची आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाणार असल्याने या आंदोलनाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

प्रभाकर यांनी ‘एक्स’वर (X) पोस्ट करत भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. २१ ऑक्टोबर २०२६ च्या पोस्टमध्ये त्यांनी, ‘आता प्रत्येक गल्लीत जंतरमंतर! शुक्रवार २३ ऑक्टोबर २०२६ रोजी लोकशाहीच्या स्थापनेसाठी जनआंदोलन. या, या आव्हानाचा सामना करा,’ असे आवाहन केले आहे. या आंदोलनात ‘आयसा’च्या (AISA) अध्यक्षा नेहा बोरा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

सरकारच्या आर्थिक आणि परराष्ट्र धोरणांवर सातत्याने कठोर टीका करणाऱ्या प्रभाकर यांनी यापूर्वी ८ ऑक्टोबर रोजी बंगळुरूच्या फ्रीडम पार्कमध्येही सीजेपीच्या विरोधातील आंदोलनात सहभाग नोंदवला होता. त्यावेळी त्यांच्यासोबत प्रकाश राज आणि यूट्यूबर ध्रुव राठी उपस्थित होते. तसेच, त्यांनी ‘द क्रुक्ड टिंबर ऑफ न्यू इंडिया’ या पुस्तकातून नोटबंदीवर टीका करत वाढती बेरोजगारी आणि कमकुवत होत असलेल्या लोकशाही संस्थांवर लक्ष वेधले आहे.

आंध्र प्रदेशातील नरसपूरम येथे जन्मलेल्या प्रभाकर यांची दिल्लीच्या ‘जेएनयू’मध्ये निर्मला सीतारामन यांच्याशी ओळख झाली. राजकीय विचारसरणी वेगळी असूनही १९८६ मध्ये त्यांनी विवाह केला. २००९ मध्ये अभिनेते चिरंजीवी यांच्या ‘प्रजा राज्यम पार्टी’तून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर २०१४ ते २०१८ या काळात त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखालील आंध्र प्रदेश सरकारमध्ये संचार सल्लागार म्हणून काम पाहिले होते.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

'एसआयआर' (SIR) रद्द करण्याच्या मागणीसाठी सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी पुकारलेल्या आंदोलनात पराकला प्रभाकर सहभागी होत आहेत.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही