प्रतिनिधी, 22 ऑक्टोबर: गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत आपला मुलगा नविद मुश्रीफ याचा झालेला पराभव हे ठरवून केलेले षड्यंत्र असल्याची संतप्त प्रतिक्रिया मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. या निवडणुकीत गोकुळसाठी महायुतीचे पॅनल प्रमुख असलेल्या मुश्रीफ यांच्या जिव्हारी हा पराभव लागला असून, त्यांनी यासाठी महायुतीमधीलच नेत्यांवर निशाणा साधला आहे.
ओबीसी गटातून रिंगणात असलेल्या नविद मुश्रीफ यांना जिल्ह्यातील बारापैकी तब्बल आठ तालुक्यांमध्ये विरोधी उमेदवारांपेक्षा कमी मते मिळाली आहेत. यावरून मुश्रीफ यांनी संताप व्यक्त केल्यानंतर सतेज पाटील यांनी त्यांना टोला लगावला. महायुतीकडे ४ हजार ४०० मते असताना आम्ही त्यांचा पराभव कसा करणार? असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला. आमच्या उमेदवारासाठी जे आवश्यक होते ते आम्ही केले असून, आता जिल्हा बँकेच्या निवडणुकीत काय करायचे हे मुश्रीफ साहेबांनी ठरवावे, असेही पाटील म्हणाले.
दरम्यान, गोकुळ निवडणुकीचा निकाल अत्यंत धक्कादायक आणि अनपेक्षित असल्याची कबुली खासदार धनंजय महाडिक यांनी दिली. आम्ही मतदारांपर्यंत पोहोचून त्यांना समजावून सांगण्यात कमी पडलो, तसेच महायुतीच्या काही गोष्टी लोकांना न पटल्याने मोठ्या प्रमाणावर क्रॉस व्होटिंग झाल्याचे त्यांनी मान्य केले. ग्राऊंडवरील परिस्थितीचा अंदाज न आल्याने हा पराभव झाल्याचे सांगत त्यांनी जनतेचा कौल स्वीकारल्याचे स्पष्ट केले.
गोकुळमध्ये फोडाफोडीचे कोणतेही राजकारण होणार नाही, आमचे १२ उमेदवार निवडून आले असून आम्ही सक्षम विरोधी पक्षात बसणार आहोत, असे महाडिक म्हणाले. भाजपसंदर्भात पसरलेल्या अफवांवर बोलताना अशी कोणतीही बैठक झाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शपथा घेण्याच्या मुद्द्यावर ते म्हणाले की, हिंदू लोक परीक्षा किंवा निवडणूक आली की मंदिरात जाऊन नमस्कार करतात, यात नवीन काही नाही. तसेच, ‘नव्यांना जुने आणि जुन्यांना नवे पसंत नव्हते’ असे घडले असावे, मात्र आता पराभवाचे आत्मचिंतन करून भविष्यात चांगल्या कामाला पाठिंबा आणि चुकीच्या गोष्टींना विरोध केला जाईल, असेही त्यांनी नमूद केले.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘आम्ही तारीख देत नाही, थेट ऑपरेशन करतो’; दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर घणाघात
- झोपेतून उठल्यावर हात सुन्न का होतात? जाणून घ्या यामागची कारणे आणि धोके
- मी पुराव्याशिवाय बोलत नाही, शिंदेंनी ५०० कोटींच्या देवाणघेवाणीवर सत्य सांगावे: मनोज जरांगेंचा इशारा
Quick Answers
आपला मुलगा नविद मुश्रीफ याचा झालेला पराभव हे ठरवून केलेले षड्यंत्र असल्याची संतप्त प्रतिक्रिया हसन मुश्रीफ यांनी दिली असून, त्यांनी यासाठी महायुतीमधीलच नेत्यांवर निशाणा साधला आहे.
नविद मुश्रीफ हे ओबीसी गटातून रिंगणात होते आणि त्यांना जिल्ह्यातील बारापैकी तब्बल आठ तालुक्यांमध्ये विरोधी उमेदवारांपेक्षा कमी मते मिळाली.
महायुतीकडे ४ हजार ४०० मते असताना आम्ही त्यांचा पराभव कसा करणार? असा सवाल सतेज पाटील यांनी उपस्थित केला आणि जिल्हा बँकेच्या निवडणुकीत काय करायचे हे मुश्रीफ साहेबांनी ठरवावे, असे म्हटले.
मतदारांपर्यंत पोहोचून त्यांना समजावून सांगण्यात कमी पडलो, महायुतीच्या काही गोष्टी लोकांना न पटल्याने मोठ्या प्रमाणावर क्रॉस व्होटिंग झाले आणि ग्राऊंडवरील परिस्थितीचा अंदाज न आल्याने हा पराभव झाल्याचे धनंजय महाडिक यांनी मान्य केले.
गोकुळमध्ये फोडाफोडीचे कोणतेही राजकारण होणार नाही, आपले १२ उमेदवार निवडून आले असून आपण सक्षम विरोधी पक्षात बसणार असल्याचे धनंजय महाडिक यांनी स्पष्ट केले.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.







