प्रतिनिधी, 22 ऑक्टोबर: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका सुरू असून ख्राईस्टचर्चच्या हॅगले ओव्हल येथे पहिला सामना खेळवला जात आहे. या सामन्यातून भारतीय संघात पुनरागमन करणाऱ्या अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमारने एक ऐतिहासिक विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे. पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक निर्धाव (डॉट) चेंडू टाकण्याचा विक्रम त्याने नोंदवला असून न्यूझीलंडच्या टीम साउथीला मागे टाकले आहे.
भुवनेश्वरने आतापर्यंत पूर्ण सदस्य संघांच्या टी-२० स्पर्धेत पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक ६८० डॉट चेंडू टाकले आहेत. त्याने साउथीचा ६७९ डॉट चेंडूंचा विक्रम मोडला. या यादीत झिम्बाब्वेचा रिचर्ड नगारवा (६७४), शाहीन आफ्रिदी (६२५), ब्लेसिंग मुझाराबानी (६१४), अर्शदीप सिंग (५७६) आणि जसप्रीत बुमराह (५६९) यांचा क्रमांक लागतो. तब्बल चार वर्षांनंतर टी-२० संघात परतलेल्या भुवनेश्वरने आपल्या पहिल्याच षटकात केवळ ४ धावा देत हा टप्पा गाठला.
मात्र, दुसऱ्या षटकात त्याच्या नावावर एक नकोसा विक्रमही जमा झाला. या षटकाची सुरुवात त्याने नो-बॉलने केली आणि त्यात एकूण १७ धावा दिल्या. तब्बल ८९ सामने आणि २९९.३ षटके टाकल्यानंतर त्याने हा पहिला नो-बॉल टाकला असून या नकोशा विक्रमात तो आता इंग्लंडच्या आदिल रशीदच्या पाठोपाठ आहे. आयपीएलच्या गेल्या दोन हंगामात शानदार कामगिरी करत आरसीबीला सलग दोन विजेतेपदे मिळवून दिल्यानंतर त्याला ही संधी मिळाली आहे.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या शेवटच्या टी-२० सामन्यासाठी भुवनेश्वरची संघात निवड झाली होती, पण पावसामुळे तो सामना रद्द झाल्याने मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली आणि त्याला गोलंदाजीची संधी मिळाली नाही. आता श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली परदेशातील पहिला मालिका विजय मिळवण्याचे भारताचे लक्ष्य आहे. या सामन्यात अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. संघात शिवम दुबे आणि प्रिन्स यादव यांच्या जागी नितीश कुमार रेड्डी आणि मयंक यादव यांना संधी देण्यात आली आहे.
दरम्यान, फलंदाजीला उतरलेल्या न्यूझीलंडच्या डावाची सुरुवात धडाकेबाज झाली. सलामीवीर टिम सायफर्टने १७ चेंडूत ३ चौकार आणि १ षटकारासह २४ धावा केल्या, तर फिन ॲलनने २४ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ४५ धावा चोपल्या. प्रतिषटक १० धावांच्या सरासरीने खेळत न्यूझीलंड २०० ते २२० धावांचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून आहे. सध्या ग्लेन फिलिप्स १८ चेंडूत ३० धावांवर नाबाद असून बेव्हॉन जेकब्स त्याला साथ देत आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘आम्ही तारीख देत नाही, थेट ऑपरेशन करतो’; दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर घणाघात
- झोपेतून उठल्यावर हात सुन्न का होतात? जाणून घ्या यामागची कारणे आणि धोके
- मी पुराव्याशिवाय बोलत नाही, शिंदेंनी ५०० कोटींच्या देवाणघेवाणीवर सत्य सांगावे: मनोज जरांगेंचा इशारा
Quick Answers
भुवनेश्वर कुमारने पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक ६८० निर्धाव (डॉट) चेंडू टाकण्याचा विश्वविक्रम नोंदवला आणि यासाठी त्याने न्यूझीलंडच्या टीम साउथीचा ६७९ डॉट चेंडूंचा विक्रम मोडला.
भुवनेश्वरने तब्बल ८९ सामने आणि २९९.३ षटके टाकल्यानंतर पहिला नो-बॉल टाकला.
हा सामना ख्राईस्टचर्च येथील हॅगले ओव्हल येथे खेळवला जात आहे.
संघात शिवम दुबे आणि प्रिन्स यादव यांच्या जागी नितीश कुमार रेड्डी आणि मयंक यादव यांना संधी देण्यात आली आहे.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.







