दिल्ली, 1 नोव्हेंबर: राजधानी दिल्लीत इंडिया आघाडीच्या वतीने आयोजित महारॅलीत पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्लाबोल केला. बंगालमध्ये झालेल्या पराभवाचा आपण जशास तसा बदला घेऊ, असा थेट इशारा त्यांनी दिला. या रॅलीसाठी देशभरातून नागरिक आणि विरोधी पक्षांतील सर्व महत्त्वाचे नेते दिल्लीत एकवटले होते.
बंगाल हा ‘एसआयआर’ (स्पेशल इन्सेटिव्ह रिलिफ टू बाजेपी) प्रक्रियेचा बळी ठरल्याचा दावा बॅनर्जी यांनी केला. येथील एक कोटीपेक्षा जास्त मतदारांचा अधिकार काढून घेण्यात आल्याचे त्या म्हणाल्या. “आमचा पराभव झालेला नाही, तर आम्हाला हरवण्यात आलं आहे. आम्ही याचा बदला घेऊ आणि हा बदला लोकशाहीने घेऊ,” असे सांगतानाच, प्राण गेला तरी चालेल पण लढून लोकशाहीला वाचवू, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
निवडणूक हायजॅक करण्यात आल्याचा आरोप करत बॅनर्जी यांनी निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावरही निशाणा साधला. ज्ञानेश कुमार कधी जातील याची आपण वाट पाहत असून, अगोदर त्यांना हटवा मग पुढे बघू, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी भाजप आणि ज्ञानेश कुमार यांच्यावर टीका करण्यासाठी त्यांनी ‘जॉनी जॉनी येस पापा’ या प्रसिद्ध बालकवितेचा आधार घेतला.
भर मंचावरून कविता म्हणत त्या म्हणाल्या, “ज्ञानेश ज्ञानेश येस पापा, व्होट चोरी येस पापा, लोकशाही चोरी येस पापा, मतं लुटली बीजेपी पापा, इज्जत चोरली भाजपाने पापा, शेतकऱ्यांचा सन्मान चोरला बीजेपी पापा, मजुरांचे घर तोडले बीजेपी पापा”. यानंतर त्यांनी उपस्थितांना ‘बीजेपी पाहिजे का…नो पापा, ज्ञानेश कुमार हवेत का..नो पापा’, असे विचारत यापुढे भाजपला सत्तेतून हाकलून देण्याचे आवाहन केले.
📌 महत्वाच्या बातम्या
- कलम ३७० आणि राम मंदिराला विरोध करणारे देशविरोधी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर घणाघात
- देशातील ‘रावणलीला’ संपवण्यासाठी रामलीला मैदानावर आंदोलन : संजय राऊतांचा घणाघात
- ५व्या टी-२० मध्ये संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा फ्लॉप; वैभव सूर्यवंशी बाकावरच
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








