प्रतिनिधी, 22 ऑक्टोबर: भाजप महिला प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चित्रा वाघ यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यात करण्यात आलेल्या आरोपांचा समाचार घेताना त्यांनी थेट संजय राऊत यांच्या राजकीय पात्रतेवर आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर बोचरी टीका केली.
‘भांडुपमध्ये स्वतःचा साधा एक नगरसेवक निवडून आणायची धमक नसणाऱ्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊंवर बोलण्याचे धाडस करू नये’, असा घणाघात चित्रा वाघ यांनी केला. सकाळी उठून माईकसमोर बोलणाऱ्या राऊतांनी आधी स्वतःची राजकीय पात्रता तपासावी. आधी भांडूप जिंका आणि मग देश जिंकायच्या गोष्टी करा, असा टोलाही त्यांनी लगावला.
काश्मीरमधून कलम ३७० कायमचे हटवून अखंड हिंदुस्थानचे स्वप्न पाहणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर बोलण्याची तुमची औकात आहे का, असा खडा सवाल वाघ यांनी राऊतांना विचारला. राम मंदिराच्या मुहूर्तावर बोट ठेवणाऱ्यांना लाज वाटायला हवी. राम मंदिराचा मुहूर्त अगदी योग्य होता, तुमचा मुहूर्त मात्र २०१९ मध्ये चुकला होता, जेव्हा तुम्ही जनादेशाचा अपमान करून राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पायाशी जाऊन बसलात, अशी आठवण त्यांनी करून दिली.
उद्धव ठाकरे यांच्यावरही त्यांनी सडकून टीका केली. मतदार याद्यांवर आरोप करून आतापासूनच पराभवाची तयारी करू नका, असा सल्ला त्यांनी दिला. बनाव रचून राजकारण करण्याचे दिवस संपले असून, रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांच्या जिवावर सत्ता मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांनी हे शिवरायांचे राज्य असल्याचे लक्षात ठेवावे. हा देश डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालत असून इथे घुसखोरांना थारा नाही, असे वाघ म्हणाल्या.
ज्यांना स्वतःचा पक्ष आणि आमदार सांभाळता आले नाहीत, ते आता सत्तांतराच्या गप्पा मारत आहेत. राहुल गांधींच्या ‘व्हिएतनाम मॉडेल’वर महाराष्ट्रात सत्ता मिळत नसते, या शब्दांत चित्रा वाघ यांनी ठाकरेंना सुनावले.
दसरा मेळाव्यात बोलताना संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर ‘बिकाऊ माल’ अशी खोचक टीका केली होती. तसेच, मुंबईतील गुंडगिरीवरून भाष्य करताना ‘लॉरेन्स बिश्नोई अस्तित्वातच नाही, अमित शाह हेच लॉरेन्स बिश्नोई आहेत’, असा अत्यंत गंभीर आरोप राऊत यांनी केला होता. याच आरोपांना आता भाजपकडून चित्रा वाघ यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘आम्ही तारीख देत नाही, थेट ऑपरेशन करतो’; दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर घणाघात
- झोपेतून उठल्यावर हात सुन्न का होतात? जाणून घ्या यामागची कारणे आणि धोके
- मी पुराव्याशिवाय बोलत नाही, शिंदेंनी ५०० कोटींच्या देवाणघेवाणीवर सत्य सांगावे: मनोज जरांगेंचा इशारा
Quick Answers
भांडुपमध्ये स्वतःचा एक नगरसेवक निवडून आणायची धमक नसणाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवाभाऊंवर बोलण्याचे धाडस करू नये, असा घणाघात चित्रा वाघ यांनी केला. तसेच राऊतांनी आधी स्वतःची राजकीय पात्रता तपासावी आणि आधी भांडूप जिंकून मग देश जिंकायच्या गोष्टी कराव्यात, असा टोला त्यांनी लगावला.
संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर 'बिकाऊ माल' अशी टीका केली होती. तसेच मुंबईतील गुंडगिरीवरून भाष्य करताना 'लॉरेन्स बिश्नोई अस्तित्वातच नाही, अमित शाह हेच लॉरेन्स बिश्नोई आहेत' असा आरोप केला होता.
चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरे यांना मतदार याद्यांवर आरोप करून आतापासूनच पराभवाची तयारी करू नका, असा सल्ला दिला.
राम मंदिराचा मुहूर्त योग्य होता, परंतु २०१९ मध्ये जेव्हा तुम्ही जनादेशाचा अपमान करून राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पायाशी जाऊन बसलात, तेव्हा तुमचा मुहूर्त चुकला होता, अशी आठवण चित्रा वाघ यांनी करून दिली.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








