T20 World Cup : बांगलादेश पाठोपाठ पाकिस्तानही स्पर्धेबाहेर?; मोहसीन नक्वींनी दिली थेट ‘ही’ धमकी!

बांगलादेशला वर्ल्ड कपमधून वगळल्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आक्रमक झाले आहे. ‘सरकारने सांगितलं तर आम्हीही खेळणार नाही’, असा थेट इशारा मोहसीन नक्वींनी दिला आहे.

Published On: 

Pakistan Threat T20 World Cup: नक्वींचा आयसीसीला इशारा!

क्रिकेटच्या मैदानात खेळाडूंपेक्षा सध्या बोर्डांचे अधिकारीच जास्त गाजतायत की काय, असा प्रश्न पडलाय. बांगलादेशने सुरक्षेचे कारण देत भारतात खेळण्यास नकार दिला आणि आयसीसीने त्यांना थेट बाहेरचा रस्ता दाखवला. पण आता या वादात पाकिस्तानने उडी घेतल्याने वातावरण चांगलंच तापलं आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी आयसीसीच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत चक्क T20 World Cup 2026 वर बहिष्कार टाकण्याची अप्रत्यक्ष धमकीच दिली आहे.

T20 World Cup 2026 

आयसीसीने बांगलादेशच्या जागी स्कॉटलंडला संधी दिल्यानंतर नक्वींचा पारा चढला आहे. “आयसीसी दुटप्पी भूमिका घेऊ शकत नाही. बांगलादेशवर हा अन्याय आहे आणि आम्ही त्यांच्या सोबत आहोत,” असं त्यांनी स्पष्ट केलं. पण खरा बॉम्ब तर त्यांनी पुढे टाकला. नक्वी यांनी रोखठोक शब्दांत सांगितलं की, “जर पाकिस्तान सरकारने आम्हाला वर्ल्ड कप खेळू नका असा आदेश दिला, तर आम्ही खेळणार नाही. आयसीसीने मग खुशाल २२ व्या संघाचा शोध घ्यावा.”

आम्ही आयसीसीपेक्षा आमच्या सरकारला बांधील आहोत, असं म्हणत त्यांनी या प्रकरणातील चेंडू आता सरकारच्या कोर्टात टोलवला आहे. बांगलादेशने आपले सामने श्रीलंकेत हलवण्याची मागणी केली होती, जी आयसीसीने फेटाळली. अखेर बांगलादेश स्पर्धेतून बाहेर पडला आणि आता स्कॉटलंडला संधी मिळाली आहे.

मोहसीन नक्वी आणि भारतीय क्रिकेट बोर्ड यांच्यातील हे शीतयुद्ध नवीन नाही. याआधी आशिया कपच्या ट्रॉफीवरूनही मोठा ड्रामा झाला होता. भारतीय संघाने नक्वींच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर ते ट्रॉफी घेऊन निघून गेले होते. आता बांगलादेशच्या खांद्यावर बंदूक ठेवून पाकिस्तान पुन्हा एकदा भारताच्या विरोधात वातावरण निर्मिती करतोय का, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही