कपिल देव यांचा संजू सॅमसनला कडक सॅल्युट; पण ‘त्या’ फ्लॉप खेळाडूबाबत केला सर्वात मोठा खुलासा!

T20 वर्ल्ड कपमध्ये संजू सॅमसनच्या वादळी खेळीचं कपिल देव यांनी कौतुक केलं असून, फ्लॉप ठरणाऱ्या अभिषेक शर्मालाही मोलाचा गुरुमंत्र दिला आहे.

Published On: 

T20 World Cup 2026: कपिल देव यांचा मोठा सल्ला!

क्रिकेटच्या मैदानात एखादा खेळाडू एका रात्रीत हिरो ठरतो, तर दुसरा अचानक शून्यावर येतो. सध्या भारतीय संघात नेमकं असंच काहीसं चित्र पाहायला मिळतंय.

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये भारताने इंग्लंडचा थरारक पराभव करून फायनल गाठली. या विजयात संजू सॅमसनने (Sanju Samson) खऱ्या अर्थाने मैदान मारलं, पण एका युवा खेळाडूच्या सलग फ्लॉप शोने सर्वांचं टेन्शन वाढवलं आहे. यावर आता भारताला पहिला विश्वचषक जिंकून देणाऱ्या कपिल देव (Kapil Dev) यांनी मौन सोडलंय.

T20 World Cup 2026

इंग्लंडविरुद्धच्या हाय-व्होल्टेज सामन्यात संजू सॅमसनने अवघ्या ४२ चेंडूंत नाबाद ८९ धावांची वादळी खेळी केली. यात त्याने ८ चौकार आणि ७ गगनभेदी षटकार ठोकले. भारताला २५३ धावांचा डोंगर उभारण्यात संजूचाच सर्वात मोठा वाटा होता. कपिल देव यांनी संजूचं तोंडभरून कौतुक केलंय. “संजू हा एक मोठा खेळाडू आहे आणि त्याने शेवटच्या दोन सामन्यांत अप्रतिम क्रिकेट खेळलंय,” अशी पावती त्यांनी दिली.

पण दुसरीकडे अभिषेक शर्माची बॅट मात्र पूर्णपणे शांत आहे. या स्पर्धेतील ७ डावांत त्याने फक्त ८९ धावा केल्या असून, सेमीफायनलमध्येही तो केवळ ९ धावांवर तंबूत परतला. यावर कपिल देव यांनी अत्यंत सूचक विधान केलं आहे. “खेळाडू कधी कधी लयीतून भरकटतो, अभिषेकसोबतही नेमकं तेच झालंय. पण संघ व्यवस्थापन आणि स्वतः अभिषेकने स्वतःवर विश्वास ठेवायला हवा. तो मोठा खेळाडू आहे आणि नक्कीच कमबॅक करेल,” असा मोठा विश्वास कपिल पाजींनी व्यक्त केला आहे.

इंग्लंडच्या जेकब बेथेलने ४८ चेंडूंत १०५ धावांची धडकी भरवणारी खेळी करून भारताच्या तोंडचे पाणी पळवले होते. पण अखेर टीम इंडियाने हा सामना खिशात टाकलाच. आता ८ मार्चला अहमदाबादमध्ये भारत आणि न्यूझीलंड भिडणार आहेत. या महाअंतिम सामन्यात कपिल देव यांचा हा ‘गुरुमंत्र’ अभिषेकला तारणार का? याकडेच तमाम क्रिकेट चाहत्यांचे डोळे लागले आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही