Share

लोकांकडून शिव्या……ट्रोलर्सनी सर्व मर्यादा ओलांडल्या; श्रेयस अय्यरच्या बहिणीचा संताप

पंजाब किंग्स आयपीएलमधून बाहेर पडल्यानंतर श्रेयस अय्यरची बहीण श्रेष्ठाला अश्लील ट्रोलिंगचा सामना करावा लागला. यावर तिने व्हिडीओतून संताप व्यक्त करत स्पष्टीकरण दिलंय.

Published On: 

Shreshta Iyer Controversy: श्रेयसच्या बहिणीचा संताप!

🕒 1 min read

सोशल मीडियावर एखाद्या छोट्याशा गोष्टीचा किती मोठा राईचा पर्वत होऊ शकतो, याचा धक्कादायक प्रत्यय पुन्हा एकदा समोर आलाय. आयपीएल २०२६ (IPL 2026) च्या स्पर्धेतून पंजाब किंग्स (PBKS) बाहेर पडल्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरची बहीण श्रेष्ठा अय्यर अचानक रडारवर आली आहे.

एका जुन्या व्हिडीओवरून तिला अक्षरशः भयानक ट्रोलिंगचा सामना करावा लागत असून, आता या वाढत्या Shreshta Iyer Controversy वर संतापलेल्या श्रेष्ठाने थेट मौन सोडलंय.

Shreshta Iyer Controversy

सोशल मीडियावर एक नवा व्हिडीओ पोस्ट करत तिने ट्रोलर्सचा चांगलाच समाचार घेतला. “माझ्या कामाच्या ठिकाणी लोक फोन करून अश्लील भाषेत बोलत आहेत आणि माझा अपमान करत आहेत. या बेरोजगार आणि निराश लोकांनी आता सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत,” असा थेट प्रहार तिने या व्हिडीओतून केला आहे.

६ एप्रिल रोजी केकेआर विरुद्ध पंजाब किंग्सचा सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यावेळी पंजाबला एक गुण मिळाला. त्यावर श्रेष्ठाने मजेत एक व्हिडीओ बनवत म्हटलं होतं की, ‘पंजाबी लोकांचं मन मोठं असतं, हा गुण तुमच्यासाठी.’ पण हा व्हिडीओ केकेआरची खिल्ली उडवणारा असल्याचा अर्थ चाहत्यांनी काढला.

आता पंजाब संघ स्पर्धेतून बाहेर पडताच याच जुन्या व्हिडीओचा राग काढत काही जण अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन तिला टार्गेट करत आहेत. यावर स्पष्टीकरण देताना श्रेष्ठाने अत्यंत स्पष्ट शब्दांत सांगितलं की, “तो व्हिडीओ केवळ एक मजेचा भाग होता. माझा कोणताही वाईट हेतू नव्हता. माझा भाऊ क्रिकेटपटू आहे, त्यामुळे मी सर्वच खेळाडूंचा आणि संघांचा आदर करते.”

केवळ एका मजेच्या व्हिडीओवरून खेळाडूंच्या कुटुंबीयांना थेट अश्लील शिवीगाळ करण्यापर्यंत मजल गेल्याने सध्या क्रीडा वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही