Share

महाराष्ट्रात निसर्गाचा रुद्रावतार; पावसाचा दणादण मारा, भयंकर वाऱ्याने घराची पत्रेही उडाली

राज्याच्या विविध भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. अनेक ठिकाणी घरांचे पत्रे उडाल्याने नागरिकांची मोठी धावपळ उडाली असून उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.

Published On: 

Maharashtra Rain News: राज्यात अवकाळीचा हाहाकार!

कडक उन्हाळ्याने हैराण झालेल्या राज्यात अचानक निसर्गाने असा काही रुद्रावतार धारण केला की लोकांची अक्षरशः पळापळ झाली. ‘इकडे लपू की तिकडे लपू’ अशी अवस्था नागरिकांची झाली होती.

आज अचानक आलेल्या पावसाने (Maharashtra Unseasonal Rain) ने मराठवाडा आणि विदर्भात मोठी दाणादाण उडवून दिली आहे. कुठे धूळीचे लोट, तर कुठे थेट घरांचे पत्रे उडाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

Maharashtra Unseasonal Rain

छत्रपती संभाजीनगर शहर आणि वाळूज परिसरात सायंकाळी अचानक काळेकुट्ट ढग दाटून आले आणि दिवसाढवळ्या अंधार पडला. वादळी वाऱ्यासह सुरू झालेल्या मुसळधार पावसाने शहरात धुळीचे साम्राज्य निर्माण झाले.

वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की अनेक घरांवरील पत्रे थेट हवेत भिरकावले गेले. रस्त्यावर झाडांच्या फांद्या तुटून पडल्याने वाहतुकीचा बोजवारा उडाला. दुचाकीस्वारांना तर गाड्या चालवणेही कठीण झाले होते. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे.

फक्त संभाजीनगरच नाही, तर राज्याच्या इतर भागांनाही या पावसाने झोडपून काढले. धाराशिवच्या उमरगा, बीडमधील आष्टी, अकोल्यातील अकोट आणि अमरावती शहरातही वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला.

सलग १० ते ३० मिनिटे पडलेल्या या पावसामुळे तापलेल्या वातावरणात मोठा गारवा निर्माण झाला असून उकाड्याने त्रस्त नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

एकीकडे वादळाने तारांबळ उडाली असली तरी, दुसरीकडे बळीराजा मात्र काहीसा सुखावला आहे. सध्या राज्यात मान्सूनपूर्व मशागतीची कामे वेगात सुरू आहेत. नांगरणी आणि पेरणीपूर्व तयारीसाठी हा पाऊस संजीवनी ठरणार असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install