Share

चांदी 5 लाख, तर सोने 3 लाखांच्या पुढे जाणार; रॉबर्ट कियोसाकींची सोन्या-चांदीबाबत धक्कादायक भविष्यवाणी

रॉबर्ट कियोसाकी यांनी जागतिक बाजार कोसळण्याचा मोठा इशारा दिला आहे. तसेच सोने आणि चांदीच्या ऐतिहासिक दरवाढीची भविष्यवाणी करत गुंतवणूकदारांची झोप उडवली आहे.

Published On: 

Gold-Silver Price Prediction: सोने जाणार 3 लाखांच्या पार!

तुम्ही जर शेअर बाजारात किंवा सोन्यात गुंतवणूक करत असाल, तर ही बातमी तुमची झोप उडवू शकते. जगभरात सध्या मंदीची चर्चा सुरू असतानाच एका जगप्रसिद्ध आर्थिक तज्ज्ञाने असा दावा केलाय, ज्याने थेट जागतिक अर्थव्यवस्थेत खळबळ उडाली आहे.

‘रिच डॅड पुअर डॅड’चे लेखक आणि प्रसिद्ध गुंतवणूकदार रॉबर्ट कियोसाकी यांनी सोन्या-चांदीच्या (Gold Silver Price Prediction) दराबाबत भयंकर अंदाज वर्तवला आहे. त्यांनी नुकतंच Gold-Silver Price Prediction करत एक सोशल मीडिया पोस्ट शेअर केली आहे.

Gold Silver Price Prediction

यात त्यांनी दिग्गज मार्केट अ‍ॅनालिस्ट जिम रेकॉर्ड्स यांचा हवाला देत म्हटले आहे की, “येत्या काळात सोने १ लाख डॉलर तर चांदी २०० डॉलर प्रति औंस या ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचेल.” भारतीय चलनानुसार हा आकडा सोन्यासाठी ३ लाखांच्या आणि चांदीसाठी ५ लाखांच्या घरात जाऊ शकतो.

कियोसाकी यांनी केवळ दरांचा अंदाज वर्तवला नाही, तर जागतिक बाजाराला मोठा इशाराही दिला आहे. “मार्केटमध्ये लवकरच मोठी आणि भयंकर घसरण होणे निश्चित आहे,” असा मोठा गौप्यस्फोट त्यांनी केला.

कागदी चलनावर विसंबून न राहता सोने, चांदी आणि बिटकॉइनसारख्या ठोस मालमत्तेत गुंतवणूक करण्याचा सल्ला ते वारंवार देत आहेत. विशेष म्हणजे, बिटकॉइनचे दर थेट ७ लाख ५० हजार डॉलरवर जातील, असा दावाही त्यांनी केला आहे.

कियोसाकी यांच्या या इशाऱ्यामुळे जग एका मोठ्या आर्थिक बदलाच्या (Financial Reset) उंबरठ्यावर आहे का, अशी चर्चा रंगू लागली आहे. “बुद्धिमान गुंतवणूकदार तेच असतात, जे भविष्य ओळखून पावले उचलतात. या मंदीत बळी पडण्याऐवजी तुम्ही अधिक श्रीमंत होऊ शकता,” असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

सध्या जगातील वाढता भू-राजकीय तणाव आणि महागाई पाहता गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. जागतिक बँक आणि आयएमएफच्या (IMF) ताज्या अहवालानुसार, जगावरील सरकारी कर्ज तब्बल १०० ट्रिलियन डॉलरच्या पार गेले आहे.

अमेरिका, जपानसारखे मोठे देशही कर्जाच्या खाईत आहेत. अशा परिस्थितीत कियोसाकी यांचा हा इशारा खरा ठरल्यास जागतिक अर्थव्यवस्थेत मोठा भूकंप येऊ शकतो.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install