🕒 1 min read
युद्धाचे ढग विरळ झाले की बाजारात शांतता येते असं म्हणतात, पण सराफा बाजारात मात्र सध्या अगदी उलटं चित्र पाहायला मिळत आहे. अमेरिका आणि इराणमधील तणाव कमी होताच सोन्या-चांदीच्या दरांनी (Gold Silver Rate) थेट आभाळाला गवसणी घातली आहे. जागतिक बाजारात झालेल्या या उलथापालथीमुळे बाजारात एकच खळबळ उडाली आहे.
गेल्या चोवीस तासांतच सोन्याच्या दरात तब्बल ३२०० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे जीएसटीशिवाय सोन्याचा भाव १,४७,८०० वरून थेट १,५१,००० वर पोहोचलाय. फक्त सोनंच नाही, तर चांदीनेही ग्राहकांना मोठा शॉक दिलाय. चांदीच्या दरात एकाच झटक्यात १०,००० रुपयांची वाढ झाली असून, चांदी आता २,४५,००० वरून थेट २,५५,००० रुपयांवर गेली आहे. ऐन लग्नसराईत हे Gold-Silver Rate वाढल्याने सामान्य ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ बसणार हे नक्की.
Gold Silver Rate
आज मुंबईसह राज्यात २४ कॅरेट सोन्याचा दर प्रतिग्रॅम १५,२४६ रुपये, तर २२ कॅरेटसाठी १३,९७५ रुपये मोजावे लागत आहेत. तुम्ही जर १० ग्रॅमचे २२ कॅरेटचे दागिने बनवायला गेलात, तर १,३९,७५० रुपये अधिक मेकिंग चार्जेस आणि जीएसटी असा मोठा फटका तुम्हाला बसेल. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि डॉलरच्या चढउतारामुळे या किमतीत आणखी बदल होऊ शकतात, असा जाणकारांचा अंदाज आहे.
बाजारात सोनं महागलं असलं तरी, घरात किती सोनं ठेवावं यावरही इन्कम टॅक्सची बारीक नजर असते. आयकर विभागाच्या नियमानुसार, विवाहित महिला ५०० ग्रॅम, अविवाहित महिला २५० ग्रॅम आणि पुरुष जास्तीत जास्त १०० ग्रॅम सोनं घरात ठेवू शकतात. यापेक्षा जास्त सोनं आढळल्यास मात्र तुम्हाला आयकर विभागाच्या कारवाईला सामोरं जावं लागू शकतं. त्यामुळे खरेदी केलेल्या सोन्याचे पक्के बिल नेहमी स्वतःजवळ बाळगा.
📌 महत्वाच्या बातम्या
- इशान किशनचा पलटवार आणि पंजाबची बेइज्जती; ‘त्या’ ५ शब्दांच्या पोस्टने उडवली मोठी खिल्ली!
- केएल राहुलचा पंजाबविरुद्ध रेकॉर्डब्रेक धमाका; ‘त्या’ एका खेळीने विराट अन् अभिषेकचे रेकॉर्ड्सही मोडीत!
- सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा मोठी उसळी; ‘या’ कारणामुळे ग्राहकांचे बजेट कोलमडणार!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











