Share

सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा मोठी उसळी; ‘या’ कारणामुळे ग्राहकांचे बजेट कोलमडणार!

जागतिक बाजारातील तणावामुळे सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा मोठी उसळी पाहायला मिळत आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर लाखांच्या पार गेल्याने ग्राहकांची चिंता वाढली आहे.

Published On: 

Gold Rate drop trend and stacked gold coins on trading screen

आंतरराष्ट्रीय राजकारणात कधी काय होईल आणि त्याचा फटका आपल्या खिशाला कसा बसेल, हे खरंच सांगता येत नाही. याचाच प्रत्यय ग्राहकांना पुन्हा एकदा आलाय.

सध्या लग्नसराईचे दिवस आहेत आणि अशातच सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. २५ एप्रिल रोजी देशांतर्गत सराफा बाजारात Gold Silver Price मध्ये पुन्हा एकदा वाढ नोंदवली गेली आहे. मध्यपूर्वेत सुरू असलेला संघर्ष आणि अमेरिका-इराणमधील वाढत्या तणावामुळे जागतिक बाजारपेठेत अक्षरशः खळबळ उडाली आहे.

Gold Silver Price Today

गुंतवणूकदार सध्या धास्तावले असून त्यांनी सुरक्षित पर्याय म्हणून सोन्या-चांदीकडे ()Gold Silver) आपला मोर्चा वळवला आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) सोने आणि चांदीच्या दरात मोठी तेजी पाहायला मिळाली. ताज्या आकडेवारीनुसार, मे डिलिव्हरीच्या चांदीच्या दरात १.३८ टक्क्यांची वाढ होऊन ती २,४४,८४५ रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. तर सोन्यात ०.७० टक्क्यांची वाढ झालीय. हे आकडे सामान्य ग्राहकांची चिंता नक्कीच वाढवणारे आहेत.

राजधानी दिल्ली आणि मुंबईत २४ कॅरेट सोन्याचा भाव १ लाख ५४ हजारांच्या पार गेला आहे. मुंबईत २२ कॅरेटसाठी १,४१,२०० रुपये मोजावे लागत आहेत. चेन्नईमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर १,५४,९१० रुपये इतका आहे. दुसरीकडे, मुंबई आणि दिल्लीत १०० ग्रॅम चांदीसाठी २६,००० रुपये मोजावे लागत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात ‘Comex’ वरही सोन्याचे दर वधारले आहेत.

आता प्रश्न पडतो की गुंतवणूक करायची तर कशी? तज्ज्ञांच्या मते, भविष्यातील फायद्याचा विचार केल्यास ९९.९ टक्के शुद्ध असलेले २४ कॅरेट सोने हाच गुंतवणुकीचा सर्वोत्तम पर्याय आहे. मात्र, तुम्हाला दागिन्यांची हौस असेल, तर २२ कॅरेट सोनेच फायद्याचे ठरते. कारण २४ कॅरेट सोने खूप मऊ असल्याने त्यापासून दागिने घडवता येत नाहीत. भू-राजकीय तणावामुळे या दरांमध्ये आणखी चढ-उतार होऊ शकतात, त्यामुळे खरेदीपूर्वी बाजाराचा अंदाज नक्की घ्या.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही