Share

साईचं ‘सुदर्शन चक्र’ अन् आरसीबीचा धुव्वा; युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलचा ऐतिहासिक रेकॉर्ड एका झटक्यात उद्ध्वस्त!

बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर गुजरातच्या साई सुदर्शनने आरसीबीविरुद्ध वादळी शतक झळकावले. त्याने ख्रिस गेलचा सर्वात जलद दोन हजार धावांचा रेकॉर्डही मोडला आहे.

Published On: 

Sai Sudharsan Century: साईने मोडला ख्रिस गेलचा रेकॉर्ड!

क्रिकेटच्या मैदानावर कधी काय चमत्कार पाहायला मिळेल, याचा काहीच नेम नसतो! याचाच थरार पुन्हा एकदा आयपीएलच्या (IPL 2026) रणांगणात पाहायला मिळालाय. बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans) युवा स्टार साई सुदर्शनने (Sai Sudharsan) अक्षरशः ‘सुदर्शन चक्र’ फिरवत आरसीबीच्या (RCB) गोलंदाजांचा अक्षरशः धुव्वा उडवला.

या महत्त्वाच्या सामन्यात नाणेफेक जिंकून आरसीबीने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला खरा, पण साईने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत हा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरवला. त्याने अवघ्या ५८ चेंडूंत ११ दणदणीत चौकार आणि ५ गगनभेदी षटकारांच्या मदतीने १०० धावांची तुफानी खेळी साकारली.

Sai Sudharsan Century

बेंगळुरूच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडत सुदर्शनने ५७ चेंडूंतच आपलं शतक पूर्ण केलं. हे त्याच्या आयपीएल कारकिर्दीतलं तिसरं शतक ठरलं आहे. पण या वादळी शतकापेक्षा सर्वाधिक खळबळ उडाली ती त्याने मोडलेल्या एका ऐतिहासिक रेकॉर्डमुळे. या खेळीदरम्यान साईने टी-२० क्रिकेटचा ‘युनिव्हर्स बॉस’ ख्रिस गेलला (Chris Gayle) चारीमुंड्या चीत केलं आहे. आयपीएलच्या इतिहासात सर्वात जलद २००० धावा पूर्ण करण्याचा महापराक्रम आता साई सुदर्शनच्या नावावर जमा झाला आहे.

यापूर्वी हा भक्कम विक्रम ख्रिस गेलच्या नावावर होता. गेलने दोन हजार धावांचा टप्पा ४८ डावांत गाठला होता. मात्र, सुदर्शनने केवळ ४७ डावांतच ही ऐतिहासिक कामगिरी करत गेलचे सिंहासन एका झटक्यात उलथवून लावले. चिन्नास्वामीच्या खेळपट्टीवर आरसीबीच्याच विरोधात गेलचा विक्रम मोडला गेल्याने क्रिकेट वर्तुळात सध्या मोठी चर्चा रंगली आहे. शतकी खेळीनंतर सुदर्शन पॅव्हेलियनमध्ये परतला, पण तोपर्यंत त्याने गुजरातसाठी भक्कम पाया रचला होता.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही