Share

‘आमच्यात १५ वर्षांचं अंतर…’, रुचितासोबतच्या नात्यावर विशाल कोटीयनने सोडलं मौन, म्हणाला…

बिग बॉस फेम विशाल कोटियनने रुचिता जामदारसोबतच्या नात्यावर मौन सोडले असून, आमच्यात १५ वर्षांचे अंतर आणि केवळ मैत्री असल्याचे त्याने स्पष्ट केले आहे.

Published On: 

Vishal Kotian Bigg Boss: रुचितासोबतच्या नात्यावर खुलासा!

🕒 1 min read

रिअॅलिटी शोमध्ये कधी कुणाचे सूर जुळतील आणि कधी नाती बदलतील, याचा काहीच नेम नसतो. नुकत्याच पार पडलेल्या ‘बिग बॉस मराठी ६’ (Bigg Boss Marathi) मध्येही असंच काहीसं पाहायला मिळालं. तन्वी कोलतेने या पर्वाची ट्रॉफी उचलली असली, तरी सर्वाधिक चर्चा रंगली ती विशाल कोटियन (Vishal Kotian) आणि रुचिता जामदार (Ruchita Jamdar) यांच्या ‘कथित’ लव्ह अँगलची. आता घराबाहेर आल्यावर विशालने या नात्यावर मौन सोडलंय.

बिग बॉसच्या घरात असताना या दोघांच्या प्रेमाच्या चर्चांना उधाण आलं होतं. रुचिताने एका एपिसोडमध्ये प्रेमाची कबुली दिल्यासारखं वक्तव्य केलं होतं, तर विशालनेही ती आवडत असल्याचं म्हटलं होतं. पण आता चित्र पूर्ण वेगळं आहे.

Vishal Kotian Bigg Boss

तो म्हणाला, “माझी आणि रुचिताची फक्त चांगली मैत्री होती. आमच्या वयात तब्बल १५ वर्षांचं मोठं अंतर आहे.” या दोघांमध्ये खरंच काही शिजत होतं का? या प्रश्नावर विशालने स्पष्ट शब्दांत नकार दिला. तो म्हणाला, “तिची पर्सनॅलिटी खूप वेगळी आहे. ती कधीच शुद्ध मराठी बोलायची नाही. चिपांटे, टवळे असे शब्द ती सर्रास वापरायची, जे मी माझ्या आयुष्यात कधीच ऐकले नव्हते. कारण मी मुळचा मुंबईचा आहे.  आमचा एकमेकांवर खूप विश्वास होता, पण आमच्यात कधीच लव्ह अँगल नव्हता.”

विशालच्या या स्पष्टीकरणामुळे आता चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे, आठव्या आठवड्यात घराबाहेर पडलेल्या रुचितानेही याआधीच आपली भूमिका स्पष्ट केली होती.

“जेव्हा घरात संस्कृती आली, तेव्हा ती आपल्याला वेगळं करण्याचा प्रयत्न करतेय असं विशाल म्हणाला होता. पण आमच्यात मैत्रीपलीकडे दुसरं कोणतंच नातं नव्हतं,” असं रुचिताने स्पष्ट केलं होतं. त्यामुळे आता विशालच्या या ताज्या वक्तव्याने विशाल कोटियन आणि रुचिता जामदार यांच्या रिलेशनशिपच्या (Vishal Kotian And Ruchita Jamdar Relationship) सर्व चर्चांवर कायमचा पडदा पडला आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही