Share

‘झापूक झुपूक’ फेम सूरज चव्हाण बाबा झाला; ‘बिग बॉस’ विजेत्याच्या घरी जन्माष्टमीला चिमुकलीचं आगमन

‘झापूक झुपूक’ स्टाईलने प्रसिद्ध झालेला बिग बॉस फेम सूरज चव्हाण बाबा झाला असून, जन्माष्टमीच्या दिवशी त्याच्या घरी चिमुकलीचं आगमन झालं आहे.

Published On: 

Suraj Chavan blessed with a baby girl viral hospital video with wife Sanjana

Suraj Chavan: ‘बिग बॉस मराठी ५’चा विजेता आणि संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या ‘झापूक झुपूक’ स्टाईलने वेड लावणारा ‘गुलिगत स्टार’ सूरज चव्हाण आता एका नव्या प्रवासाला लागला आहे. जन्माष्टमीच्या शुभ मुहूर्तावर सूरज आणि त्याची पत्नी संजना यांच्या आयुष्यात एका गोंडस मुलीचं आगमन झालं आहे. चव्हाण कुटुंबात आनंदाला उधाण आलं असून, सोशल मीडियावरही या लाडक्या स्टारवर चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला आहे.

डिसेंबर २०२५ मध्ये सूरज आणि संजना यांनी थाटामाटात लग्नगाठ बांधली होती. आता लग्नाच्या अवघ्या नऊ महिन्यांनंतरच या जोडप्याने आई-बाबा होण्याचं सुख अनुभवलं आहे. नुकताच रुग्णालयातील एक खास व्हिडीओ समोर आला असून, त्यात सूरजची आपल्या लेकीला आणि पत्नीला भेटण्याची ओढ स्पष्टपणे पाहायला मिळत आहे.

Suraj Chavan blessed with a baby girl viral hospital video

रुग्णालयातील पहिला व्हिडीओ व्हायरल; लेकीला पाहून सूरज भारावला

काही महिन्यांपूर्वी अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने संजनाच्या चोर ओटीचा एक व्हिडीओ शेअर केला होता. तेव्हापासूनच सूरज बाबा होणार असल्याची चर्चा चाहत्यांमध्ये रंगली होती. पुढे स्वतः सूरजनेही ही गुड न्यूज सर्वांसोबत शेअर केली. विशेष म्हणजे, जान्हवीनेच स्वतः पुढाकार घेत संजनाच्या डोहाळे जेवणाचा संपूर्ण कार्यक्रम अगदी थाटामाटात आयोजित केला होता. संजनानेही तिच्या बेबी बंपसोबतचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केले होते.

आता लेकीच्या जन्मानंतरचा सूरजचा रुग्णालयातील पहिला व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. एका चाहत्याने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये रुग्णालयातील कर्मचारी आणि चाहत्यांनी या नव्या पाहुणीला पाहण्यासाठी मोठी गर्दी केल्याचं दिसत आहे. गर्दीतून वाट काढत सूरज आत गेला, बाळाला पाहिलं आणि अतिशय मायेने त्याने संजनाच्या डोक्यावरून हात फिरवला. बिग बॉसच्या घरातून महाराष्ट्राचं मन जिंकणाऱ्या सूरजच्या आयुष्यात आता खऱ्या अर्थाने गृहलक्ष्मी आली असून, त्याच्या लेकीची पहिली झलक पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही