मुंबई : राज्यात एकीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांचं उपोषण आठव्या दिवशीही सुरू असताना, आता ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. ‘स्वतःच्या हक्काचं घ्या, पण दुसऱ्याच्या ताटातलं घेऊ नका’, असा थेट इशारा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला आहे. त्यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी या आरक्षणाच्या वादात आता आणखी एक ठिणगी पडल्याचं चित्र आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाबाबत माध्यमांशी बोलताना गुलाबराव पाटील यांनी ओबीसी समाजाची नेमकी भूमिका मांडली. जर ओबीसींच्या हक्कावर गदा येत असेल, तर ओबीसी समाजही गप्प बसणार नाही, असं ते म्हणाले. तरीही, मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत राज्य सरकारची भूमिका पूर्णपणे सकारात्मक असल्याचंही त्यांनी आवर्जून सांगितलं.
Gulabrao Patil on Maratha Reservation
‘कुणाच्या ताटातलं घेऊ नये, ओबीसीही शांत बसणार नाहीत’
एकनाथ शिंदे यांनी याआधीच मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिल्याची आठवण गुलाबराव पाटील यांनी यावेळी करून दिली. सध्या सण-उत्सवांचे दिवस जवळ येत आहेत. त्यामुळे जरांगे पाटील यांनी सरकारकडे आपल्या मागण्या शांततेच्या मार्गाने मांडाव्यात, असं आवाहनही त्यांनी केलं. राज्यात कुणबी नोंदी सापडलेल्यांना प्रमाणपत्र मिळावं आणि हैदराबाद व सातारा गॅझेट लागू करावं, या मुख्य मागण्यांसाठी जरांगे पाटील अंतरवाली सराटीत उपोषणाला बसले आहेत. सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली असली, तरी अद्याप कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही, त्यामुळे जरांगे उपोषणावर ठाम आहेत.
दुसरीकडे, एमपीएससी (MPSC) पेपरफुटीच्या मुद्द्यावरही त्यांनी अत्यंत स्पष्ट भूमिका मांडली. हा थेट विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा आणि करिअरचा प्रश्न असून, यात कुणीही दोषी आढळलं, मग उद्या मी जरी त्यात असलो, तरी कठोर कारवाई झालीच पाहिजे, असं ते म्हणाले.
याचबरोबर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावरही त्यांनी मिश्किल शब्दांत निशाणा साधला. तुरुंगातून बाहेर आल्यापासून राऊत सतत आपल्यावर प्रयोग झाल्याचं सांगतात. त्यामुळे नक्की त्यांच्यावर किती आणि कोणते प्रयोग झालेत, हे आता मला तपासावं लागेल, असा खोचक टोला गुलाबराव पाटलांनी लगावला.
📌 महत्वाच्या बातम्या
- जंतरमंतर हाणामारी प्रकरण: ‘त्या’ व्हायरल पॉडकास्टवरून चिराग पासवान भडकले; थेट पोलिसांत केली तक्रार
- ‘गार्डन से रिपोर्टिंग लाईव्ह…’; रोहित शर्माची टीव्हीवर धमाकेदार एन्ट्री, तर दुसरीकडे BCCI नेही केली मोठी घोषणा
- व्हॉट्सॲपने आणलं नवं भन्नाट फीचर; चॅटचा संपूर्ण लुक बदलून टाकणारी ही अपडेट पाहिलीत का?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











