Share

राखी सावंतच्या ‘त्या’ आरोपांवर दिपाली सय्यद संतापली! घराबाहेर येताच सोडलं मौन, म्हणाली…

बिग बॉस मराठीच्या घरात राखी सावंतने केलेल्या गंभीर आरोपांनंतर दिपाली सय्यदने घराबाहेर येताच मोठा गौप्यस्फोट केला आहे. तिने राखीला सडेतोड उत्तर दिले आहे.

Published On: 

Bigg Boss Marathi 6: राखीच्या आरोपांवर दिपाली संतापली!

एखाद्याच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणं किती सोपं असतं ना? बिग बॉसच्या घरात नुकतंच हे पाहायला मिळालं आणि त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

बिग बॉस मराठीच्या सहाव्या सिझनची (Bigg Boss Marathi 6) विजेती तन्वी कोलते ठरली. पण सध्या सर्वात जास्त चर्चा रंगलीये ती राखी सावंत (Rakhi Sawant) आणि दिपाली सय्यद (Dipali Sayyad) यांच्यातल्या वादाची. घराबाहेर आल्यावर आता दिपालीने मौन सोडलंय. राजश्री मराठीला दिलेल्या ताज्या मुलाखतीत तिने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.

Bigg Boss Marathi 6

वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतलेल्या राखीने घरात अक्षरशः धुमाकूळ घातला होता. राकेश आणि दिपाली यांच्यात चांगली मैत्री होती. पण हीच मैत्री राखीला खटकली. “तुझं लग्न झालंय तरी तू हे करतेस? राकेशसोबत अफेअर करतेस का?” असा अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप राखीने दिपालीवर केला होता. यावरून घरात मोठा वाद झाला होता.

यावर दिपालीने आता सडेतोड उत्तर दिलंय. राखी माझ्या पतीला ओळखते, तरीही केवळ गेमसाठी तिने मला डिवचलं, असा मोठा गौप्यस्फोट दिपालीने केला. तिने सर्व मर्यादा ओलांडल्या असं सांगत दिपालीने तीव्र संताप व्यक्त केला. बिग बॉसच्या घरात घडलेल्या अनेक गोष्टी प्रेक्षकांना दाखवण्यात आल्या नसल्याचा दावाही तिने यावेळी केला.

माझ्याही तोंडातून एक चुकीचा शब्द निघाला होता आणि मी त्याची माफी मागितली होती, अशी कबुली दिपालीने दिली. “२७ वर्षांचा संसार टिकवणं कोणत्याही स्त्रीसाठी सोपं नसतं” हे तिचं वाक्य बरंच काही सांगून जातं. एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला समजून घ्यायला हवं, अशी खंत तिने व्यक्त केली. या संपूर्ण प्रकरणामुळे आता सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही