Share

केएल राहुलचा पंजाबविरुद्ध रेकॉर्डब्रेक धमाका; ‘त्या’ एका खेळीने विराट अन् अभिषेकचे रेकॉर्ड्सही मोडीत!

आयपीएलच्या ३५ व्या सामन्यात केएल राहुलने नाबाद १५२ धावांची खेळी करत पंजाब किंग्सला धुळीस मिळवले. या ऐतिहासिक कामगिरीने अनेक मोठे विक्रम मोडीत निघाले आहेत.

Published On: 

KL Rahul 152 Runs: राहुलचा पंजाबविरुद्ध रेकॉर्डब्रेक धमाका!

क्रिकेटच्या मैदानात कधी कोणता रेकॉर्ड मोडला जाईल, हे खरंच सांगता येत नाही. याचाच प्रत्यय पुन्हा एकदा क्रिकेट चाहत्यांना आलाय. सध्या सुरू असलेल्या आयपीएल 2026 (IPL 2026) स्पर्धेत विक्रमांची अक्षरशः बरसात होत आहे. पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात केएल राहुलने (KL Rahul) असा काही ‘राडा’ घातलाय की भल्याभल्यांना घाम फुटलाय.

दिल्ली कॅपिटल्सकडून (Delhi Capitals) खेळताना ३५ व्या सामन्यात केएल राहुलने पंजाबच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. त्याने फक्त ६७ चेंडूत नाबाद १५२ धावांची वादळी खेळी केली. यात तब्बल १६ चौकार आणि ९ उत्तुंग षटकारांचा पाऊस पाडत त्याने स्टेडियममध्ये एकच खळबळ उडवून दिली. जवळपास २२६ च्या स्ट्राईक रेटने खेळत त्याने पंजाबच्या गोलंदाजीच्या चिंधड्या उडवल्या.

KL Rahul 152 Runs

या एकाच झंझावाती खेळीत त्याने अनेक जुने विक्रम उद्ध्वस्त केलेत. आयपीएलच्या इतिहासात तो आता तिसरा सर्वोच्च धावसंख्या उभारणारा फलंदाज ठरलाय. ख्रिस गेल (१७५*) आणि ब्रँडन मॅक्युलम (१५८*) यांच्यानंतर आता या यादीत राहुलचा नंबर लागतो. सर्वात मोठा धक्का म्हणजे, त्याने मागील पर्वातील अभिषेक शर्माचा १४१ धावांचा विक्रम मोडीत काढला आहे. आयपीएलमध्ये भारतीय खेळाडू म्हणून ही सर्वोच्च धावसंख्या आहे.

केवळ आयपीएलच नाही, तर टी-२० क्रिकेटमध्येही त्याने भारताकडून सर्वोच्च धावसंख्येचा मान पटकावला आहे. त्याने तिलक वर्माचा (१५१ धावा) रेकॉर्ड मोडला. या ऐतिहासिक कामगिरीच्या जोरावर राहुलने थेट विराट कोहलीकडून ‘ऑरेंज कॅप’ खेचून घेतली असून ७ सामन्यांत त्याने ३५७ धावांचा डोंगर उभा केलाय.

सामन्यानंतर आपल्या या महापराक्रमाबद्दल बोलताना राहुलने मोठा गौप्यस्फोट केला. तो म्हणाला, “सुरुवातीच्या ७०-८० धावांपर्यंत मी कोणताही पूर्वनियोजित विचार करत नव्हतो. योग्य क्रिकेट फटके खेळून संघाला २५० च्या पार नेण्यावरच माझा भर होता.” शेवटच्या टप्प्यात मात्र गोलंदाजांच्या फिल्डिंगनुसार आपण फटकेबाजी केल्याचे त्याने स्पष्ट केले.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही