Share

Gold Rate : सोनं भडकलं! 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या….

जागतिक तणावामुळे सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली असून, दिल्लीत भाव १.४४ लाखांवर पोहोचला आहे. जाणून घ्या मुंबईतील आजचे लेटेस्ट रेट्स.

Published On: 

Gold Rate Today | Gold Price Today

🕒 1 min read

Gold Rate : सध्या सोनं घ्यावं की थांबावं? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर ही बातमी वाचून तुमचा निर्णय पक्का होईल. जगात जेव्हा जेव्हा युद्धाचे ढग जमा होतात, तेव्हा त्याचा थेट परिणाम आपल्या खिशावर होतो, हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. आंतरराष्ट्रीय बाजारात घडणाऱ्या मोठ्या घडामोडींमुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळतेय. रशिया-युक्रेन युद्ध असो किंवा अमेरिकेने व्हेनेझुएलाच्या राष्ट्रपतींना केलेली अटक, या सगळ्याचा परिणाम म्हणून गुंतवणूकदारांनी पुन्हा एकदा सोन्याकडे धाव घेतली आहे.

सध्या जगभरात आर्थिक अनिश्चितता आहे. अमेरिका आणि इराणमधील तणावही वाढलाय. अशा वेळी शेअर बाजारात रिस्क घेण्यापेक्षा गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याला पसंती देतात. त्यामुळेच  सोन्याचे दराने (Gold Rate) ने उसळी घेतली आहे. देशाची राजधानी नवी दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम तब्बल १,४४,१६० रुपये इतका झालाय, तर दागिन्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या २२ कॅरेट सोन्याचा भाव १,३२,१६० रुपयांवर पोहोचलाय.

जर तुम्ही मुंबई, पुणे किंवा राज्याच्या इतर भागात सोने खरेदीचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठीही दर काही कमी नाहीत. मुंबईसह चेन्नई, कोलकाता आणि हैदराबादमध्ये २४ कॅरेट सोन्याचा भाव १,४४,०१० रुपयांवर व्यवहार करतोय. तर २२ कॅरेटसाठी तुम्हाला १,३२,०१० रुपये मोजावे लागणार आहेत. दुसरीकडे, अहमदाबाद, जयपूर आणि भोपाळमध्येही दिल्लीसारखेच चढे दर पाहायला मिळत आहेत.

Gold Rate | Gold Price Today

सोन्याचे दर हे केवळ मागणीवर नाही, तर आंतरराष्ट्रीय राजकारणावर ठरतात. सध्या डॉलरच्या तुलनेत रुपयावर दबाव आहे आणि जेव्हा डॉलर मजबूत होतो, तेव्हा भारतात सोनं महाग होतं. तज्ज्ञांच्या मते, जोपर्यंत हे जागतिक जिओ-पॉलिटिकल टेन्शन निवळत नाही, तोपर्यंत सोन्याच्या दरातील ही तेजी कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे लग्नसराईसाठी सोनं घ्यायचं असेल, तर खिशाला कात्री लागणार हे नक्की.

तुम्ही जर फक्त गुंतवणूक म्हणून विचार करत असाल, तर २४ कॅरेट सोनं बेस्ट आहे. पण दागिन्यांसाठी २२ किंवा १८ कॅरेट सोन्याचाच विचार करावा, कारण ते जास्त टिकाऊ असतं.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या