Share

Latur Exit Poll: लातूरकर विलासरावांना विसरले नाहीत! एक्झिट पोलचे आकडे पाहून भाजपचे टेन्शन वाढले?

लातूरमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज Exit Poll मधून वर्तवण्यात आला आहे. विलासराव देशमुखांचा प्रभाव कायम असल्याने भाजपला धक्का बसण्याची शक्यता आहे.

Published On: 

Devendra Fadnavis, Vilasrao Deshmukh, Latur Exit Poll

लातूर– निवडणुकीच्या रिंगणात अखेरच्या क्षणापर्यंत काय होईल, हे सांगता येत नाही. राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान पार पडलं असून आता सर्वांचे डोळे निकालाकडे लागले आहेत. उद्या (शुक्रवारी) मतमोजणी होणार असली, तरी त्याआधी आलेल्या एक्झिट पोलच्या आकड्यांनी राजकारण चांगलंच तापलं आहे. विशेषतः मराठवाड्यातील लातूर आणि जालना येथील आकडेवारीने अनेकांना धक्का दिला आहे.

Latur Exit Poll मध्ये काँग्रेसला बहुमत, भाजप पिछाडीवर?

लातूरमध्ये ‘कमळ’ फुलणार की ‘हात’ भारी ठरणार? याचं उत्तर एक्झिट पोलने दिलं आहे. रुद्र एक्झिट पोल आणि JDS च्या आकडेवारीनुसार, लातूरकर दिवंगत नेते विलासराव देशमुख यांना विसरलेले नाहीत, हेच पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. Latur Municipal Corporation च्या निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे.

रुद्र एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, लातूरमध्ये काँग्रेसला २८ ते ३३ जागा मिळू शकतात. तर JDS च्या पोलनुसार काँग्रेस ३७ ते ४५ जागा जिंकून एकहाती सत्ता मिळवण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, भाजपकडून रवींद्र चव्हाण यांच्यासह अनेक नेत्यांनी ताकद लावली होती, पण भाजपला लातूरमध्ये १२ ते १७ जागांवर समाधान मानावं लागेल, असा अंदाज आहे. त्यामुळे भाजप नेत्यांचे ‘ते’ दावे फोल ठरले आहेत का? अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

दुसरीकडे जालन्याचे चित्र मात्र वेगळे आहे. जालन्यात ६५ पैकी २८ जागांवर भाजप मुसंडी मारू शकतो, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला २२ जागा मिळण्याचा अंदाज आहे. त्यामुळे इथे महायुतीची सत्ता येण्याची दाट शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेचा वरचष्मा राहील, असा अंदाज आहे.

थोडक्यात काय, तर लातूरमध्ये काँग्रेसचा गड शाबूत राहण्याची चिन्हे आहेत, तर जालन्यात युतीची सरशी होऊ शकते. आता प्रत्यक्ष निकालात Exit Poll चे हे आकडे किती खरे ठरतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही