Share

‘निवडणुकीत कोणी माफी मागत नसतं, पण…’; चव्हाणांची पाठराखण करत फडणवीसांनी विरोधकांची बोलती केली बंद!

Devendra Fadnavis praises Vilasrao Deshmukh’s legacy and clarifies Ravindra Chavan’s apology during the election campaign.

Published On: 

Devendra Fadnavis, Vilasrao Deshmukh, Latur Exit Poll

जळगाव – निवडणुका आल्या की आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उडतो, जुनी प्रकरणं उकरून काढली जातात. पण राजकारणात काही व्यक्ती अशा असतात ज्या पक्षांच्या भिंती ओलांडून सर्वांच्या मनात घर करतात. विलासराव देशमुख हे त्यापैकीच एक! आता भर निवडणुकीत खुद्द देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीच विलासरावांच्या आठवणींना उजाळा देत एक मोठं विधान केलंय, ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय.

Devendra Fadnavis praises Vilasrao Deshmukh’s legacy

विलासराव देशमुख यांच्याबद्दल बोलताना फडणवीस म्हणाले की, राजकारणात मतभेद असू शकतात, पण मनभेद नाहीत. “पक्ष कोणताही असो, पण विलासराव देशमुखांबद्दल (Vilasrao Deshmukh) आम्हा सर्वांनाच नितांत आदर आहे. त्यांच्या स्मृती कोणीही पुसू शकत नाही आणि त्या कधीच पुसल्या जाणार नाहीत,” असे रोखठोक मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. आम्ही जरी आज काँग्रेसच्या विरोधात निवडणूक लढवत असलो, तरी महाराष्ट्राच्या जडणघडणीत आणि विकासात विलासरावांचं योगदान मोठं आहे. महाराष्ट्रात उत्तम काम करणाऱ्या नेत्यांच्या यादीत विलासराव देशमुखांचं नाव वरच्या फळीत येतं, असंही फडणवीसांनी (Devendra Fadnavis) यावेळी कबूल केलं.

रवींद्र चव्हाण यांच्या एका वक्तव्यावरून सध्या वादंग निर्माण झाला होता. यावर पडदा टाकताना फडणवीसांनी सूचक वक्तव्य केलं. ते म्हणाले, “साधारणपणे निवडणुकीच्या काळात कोणीही दिलगिरी व्यक्त करत नाही. पण रवींद्र चव्हाणांनी दिलगिरी व्यक्त केली आहे, कारण त्यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला.”. स्वतःच्या नेत्याची पाठराखण करतानाच फडणवीसांनी विरोधकांचं तोंडही बंद केलंय. विलासरावांच्या (Vilasrao Deshmukh) कामाची पोचपावती देत भाजपने या वादावर आता पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केलाय.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही