Share

“राज साहेबांनी ‘हिरवं रक्त’ असलेल्यांशी युती केली, पक्ष सरेंडर केला”; धुरींचा भाजप प्रवेश करताच स्फोटक दावा!

Ex-MNS corporator Santosh Dhuri joins BJP, alleging Raj Thackeray surrendered the party to Uddhav Thackeray.

Published On: 

Ex-MNS corporator Santosh Dhuri joins BJP, alleging Raj Thackeray surrendered the party to Uddhav Thackeray under a secret deal.

🕒 1 min read

मुंबई– नेत्यांचे पक्षांतर हा निवडणुकीचा भाग असतो, पण पक्षाचा एखादा शिलेदार जेव्हा आपल्याच ‘साहेबां’वर शरसंधान साधतो, तेव्हा राजकारण ढवळून निघतं. मुंबई महापालिका निवडणुकीच्या (BMC Election 2026) तोंडावर हेच घडलंय. मनसेचे फायरब्रँड नेते आणि माजी नगरसेवक संतोष धुरी (Santosh Dhuri) यांनी मंगळवारी भाजपचा ‘गमछा’ गळ्यात घातला. पण चर्चा त्यांच्या पक्षप्रवेशापेक्षा त्यांनी केलेल्या एका विधानाची जास्त आहे. “राज ठाकरेंनी हिरवं रक्त असलेल्या लोकांशी युती केली असून, आता मनसेचा ताबा पूर्णपणे उद्धव ठाकरेंनी घेतलाय,” असा खळबळजनक आरोप धुरी यांनी केला आहे.

Santosh Dhuri joins BJP, alleging Raj Thackeray

भाजपमध्ये प्रवेश करताच धुरी (Santosh Dhuri) यांनी आपली पहिलीच पत्रकार परिषद गाजवली. ते म्हणाले की, राज साहेबांनी आमचा पक्ष ‘मातोश्री’समोर पूर्णपणे सरेंडर केला आहे. मुंबईत मनसेला ५२ जागा सोडल्याचं चित्र असलं, तरी त्यातल्या ७-८ जागा तरी निवडून येतील का? याची शाश्वती नाही. “जिथे ठाकरेंकडे उमेदवार नव्हते किंवा जिथे त्यांच्या नगरसेवकांची नावे खराब झाली होती, अशा ‘पडक्या’ जागाच त्यांनी मनसेच्या गळ्यात मारल्या आहेत,” असा गौप्यस्फोट धुरींनी केला. माहीम, दादर आणि वरळीसारख्या मराठी बालेकिल्ल्यांमध्ये मनसेची केवळ एका जागेवर बोळवण करण्यात आल्याची खंतही त्यांनी बोलून दाखवली.

धुरी यांनी थेट संदीप देशपांडे आणि स्वतःबद्दलच्या ‘तहा’चा भांडाफोड केला. ते म्हणाले, जागावाटपाच्या चर्चेत आम्हाला जाणीवपूर्वक दूर ठेवलं गेलं. नितीन सरदेसाईंनी मला स्पष्ट सांगितलं की, वॉर्ड क्रमांक १९० आणि १९२ मिळणार नाहीत. “वरुन असा तह झालाय की, राज साहेबांनी संतोष धुरी आणि संदीप देशपांडे हे दोन ‘किल्ले’ सरेंडर केले आहेत. हे दोघे उमेदवार म्हणून दिसता कामा नयेत, असा थेट आदेशच वांद्र्याच्या बंगल्यावरून (मातोश्री) आला होता,” असे धुरींनी सांगितले.

राज ठाकरेंनी आम्हाला खूप काही दिलं, पण आता पक्षाची सूत्रं दुसऱ्याच्या हाती गेल्याने आपण बाहेर पडत असल्याचं धुरींनी (Santosh Dhuri) स्पष्ट केलं. ऐन निवडणुकीत धुरींसारखा आक्रमक नेता गेल्याने मनसेला मोठं खिंडार पडलंय, हे मात्र नक्की.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या