Share

‘पैसे वाटताना सापडला तर तिथेच बदडून काढीन’; खैरेंचा ‘तो’ इशारा अन् बावनकुळेंवर वैयक्तिक वार!

Chandrakant Khaire threatens to beat up rivals distributing money; mocks Bawankule as ‘electric contractor’.

Published On: 

Chandrakant Khaire threatens to beat up rivals distributing money; mocks Bawankule as 'electric contractor'.

🕒 1 min read

बीड– राजकारणात शब्दांचे बाण सुटले की ते किती खोलवर घाव घालतील याचा नेम नसतो. सध्या छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीच्या (Sambhajinagar Election) रणधुमाळीत हेच पाहायला मिळतंय. निवडणुकीच्या रिंगणात आरोप-प्रत्यारोप नवीन नाहीत, पण जेव्हा एखादा ज्येष्ठ नेता थेट ‘बदडून काढण्याची’ भाषा करतो, तेव्हा मात्र भुवया उंचावतात. ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी भर सभेत हा ‘इशारा’ दिलाय.

Chandrakant Khaire Warning

छत्रपती संभाजीनगर महापालिकेची निवडणूक सध्या राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलीये. शिंदे गट आणि भाजप सत्तेचा वापर करून सर्रास पैसे वाटत असल्याचा गंभीर आरोप चंद्रकांत खैरे यांनी केलाय. बीड दौऱ्यावर असताना पत्रकारांशी बोलताना खैरे म्हणाले की, सध्या उमेदवारांना मॅनेज करण्यासाठी पाकिटे पुरवली जात आहेत. पण खैरे इथेच थांबले नाहीत, तर त्यांनी चक्क “पैसे वाटताना मला कोणी भेटलं, तर तिथेच बदडून काढणार,” असा आक्रमक पवित्रा घेतला. आत्तापासूनच मते विकत घेण्याचे उद्योग सुरू आहेत, पण जनता खुळी नाही, असेही ते म्हणाले.

चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्यावर टीका करताना खैरेंनी वैयक्तिक पातळीवर जाऊन हल्लाबोल केला. “बावनकुळे हे इलेक्ट्रिक कंत्राटदार होते, नितीन गडकरींनी त्यांना पक्षात आणलं आणि आता ते फडणवीसांसोबत आहेत,” असा खोचक टोला त्यांनी लगावला. बावनकुळे हे ‘नेते बदलू माणूस’ आहेत, त्यांना कशातलं काहीही माहित नाही, अशा शब्दांत खैरेंनी त्यांचा समाचार घेतला. ‘खोटं बोल पण रेटून बोल’ हाच भाजपचा कार्यक्रम असल्याचा आरोपही त्यांनी केला.

संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी हिंदुत्वावरून केलेल्या टीकेलाही खैरेंनी आपल्या स्टाईलने उत्तर दिलं. “आम्ही गळ्यात रुद्राक्षाच्या माळा आणि कपाळावर गंध लावतो, हे हिंदुत्व नाही का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ही निवडणूक केवळ सत्तेची नसून अस्तित्वाची लढाई आहे आणि बाळासाहेबांचं विशेष प्रेम असलेल्या या शहरात आम्हीच जिंकणार, असा विश्वासही खैरेंनी यावेळी व्यक्त केला. आता खैरेंच्या या ‘बदडून काढण्याच्या’ वक्तव्यावर शिंदे गट आणि भाजप काय उत्तर देणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही