Share

टू-व्हीलर मार्केटमध्ये होंडाचा ‘धुरळा’! एका महिन्यात विकल्या ४.४६ लाख गाड्या

Honda Motorcycle & Scooter India records a massive 45% YoY growth in December 2025, selling over 4.46 lakh units amid strong demand.

Published On: 

Honda Motorcycle & Scooter India records a massive 45% YoY growth in December 2025, selling over 4.46 lakh units amid strong demand.

🕒 1 min read

मुंबई– नवीन वर्षाची सुरुवात होतेय तोच ऑटोमोबाईल क्षेत्रातून एक मोठी बातमी धडकली आहे. बाजारात मंदीची चर्चा अधूनमधून होत असली तरी, होंडाने (Honda) मात्र विक्रीच्या आकड्यांचा असा काही विक्रम केलाय की प्रतिस्पर्ध्यांची झोप उडाली आहे. जर तुम्ही नवीन गाडी घेण्याचा विचार करत असाल, तर हा ट्रेंड नक्कीच पाहण्यासारखा आहे. डिसेंबर महिन्यात होंडाच्या गाड्यांसाठी ग्राहकांनी शोरूममध्ये अक्षरशः रांगा लावल्याचे चित्र आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

विक्रीत तब्बल ४५ टक्क्यांची वाढ

होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाने (HMSI) जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, डिसेंबर २०२५ मध्ये कंपनीने एकूण ४,४६,०४८ युनिट्सची विक्री नोंदवली आहे. हा आकडा साधासुधा नाही. गेल्या वर्षीच्या याच महिन्याच्या (डिसेंबर २०२४) तुलनेत यात थेट ४५ टक्क्यांची भरभक्कम वाढ झाली आहे. यात भारतीय बाजारात विकल्या गेलेल्या ३,९२,३०६ गाड्या आणि विदेशात निर्यात झालेल्या ५३,७४२ गाड्यांचा समावेश आहे. थोडक्यात काय, तर भारतीय रस्त्यांवर सध्या ‘होंडा’चाच जलवा बघायला मिळतोय.

फक्त डिसेंबरच नाही, तर एप्रिल ते डिसेंबर २०२५ या आर्थिक वर्षाचा हिशोब मांडला, तर होंडाने (Honda) एकूण ४६,७८,८१४ गाड्यांची विक्री केली आहे. ही कामगिरी सातत्यपूर्ण असून त्यात ३ टक्क्यांची वाढ दिसून आली आहे.

याशिवाय, कंपनीने बेंगळुरू आणि दिल्लीसह अनेक ठिकाणी नवीन डीलरशिप्स सुरू करून आपले जाळे आणखी विस्तारले आहे. होंडाची ही घोडदौड पाहता, टू-व्हीलर मार्केटमध्ये त्यांची ‘दादागिरी’ कायम राहणार, असंच दिसतंय.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही