Share

टाटांचा मोठा धमाका! कमी किमतीत सनरूफसह लक्झरी फीचर्स; लाँच केली नवीन पंच फेसलिफ्ट

Tata Motors launches the 2026 Punch Facelift starting at ₹5.59 Lakh. It features a new Turbo engine, sunroof, 360-degree camera, and 6 airbags.

Published On: 

Tata Punch Facelift 2026: किंमत ५.५९ लाख! सनरूफ आणि टर्बो इंजिनसह लाँच

नवीन गाडी घ्यायचा विचार करताय? आणि बजेट थोडं ‘टाइट’ आहे? मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे. भारतीय रस्त्यांवर सध्या एसयूव्हीची क्रेझ आहे, आणि त्यात जर टाटाचं नाव असेल तर विषयच संपला. टाटा मोटर्सने पुन्हा एकदा मार्केट हलवून सोडलंय. बहुचर्चित Tata Punch Facelift 2026 अखेर लाँच झाली असून, तिची किंमत ऐकून तुम्हीही खुश व्हाल. अवघ्या ५.५९ लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) या गाडीची किंमत सुरू होत आहे.

Tata Punch Facelift 2026

गेल्या काही महिन्यांपासून टाटा मोटर्स एकामागोमाग एक धक्के देत आहे. हॅरियर, सफारी आणि सिएराच्या चर्चेनंतर आता कंपनीने आपल्या या ‘छोट्या पॅकेटमध्ये मोठा धमाका’ असलेल्या पंचला नवीन रूपात आणलंय. बुकिंग सुरू झाली असून याच महिन्यात डिलिव्हरीही मिळेल, असं कंपनीने स्पष्ट केलंय.

गाडीचा लूक आता अधिक बोल्ड आणि मॉडर्न झालाय. जुन्या मॉडेलपेक्षा नवीन बंपर, कनेक्टेड टेललॅम्प आणि LED Headlamps मुळे गाडीला एक वेगळाच रुबाब आलाय. पण खरी गंमत तर आतमध्ये आहे. आतापर्यंत स्वस्त गाड्यांमध्ये जे फीचर्स मिळत नव्हते, ते टाटाने दिले आहेत. चक्क Voice-Assisted Electric Sunroof, १०.२५ इंचाची टचस्क्रीन, ३६०-डिग्री कॅमेरा आणि व्हेंटिलेटेड सीट्ससारखे फीचर्स यात आहेत.

टाटा म्हणजे सुरक्षा, हे समीकरण इथेही कायम आहे. नवीन पंचमध्ये ६ एअरबॅग्ज आणि ५-स्टार भारत NCAP रेटिंग आहे. पॉवर हवी असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे, यात आता नवीन 1.2-litre Turbo Petrol Engine देण्यात आलंय, जे १२० PS ची ताकद देतं.

त्यामुळे जर तुम्ही फॅमिलीसाठी सुरक्षित आणि स्टायलिश गाडी शोधत असाल, तर नवीन पंच शोरूममध्ये जाऊन बघायला काहीच हरकत नाही.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही