टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये कोण मारणार बाजी? मायकल क्लार्कची मोठी भविष्यवाणी; पाकिस्तानबद्दल म्हणाला…

टी-२० वर्ल्ड कपची फायनल भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये होईल, अशी भविष्यवाणी मायकल क्लार्कने केली आहे. पाकिस्तानवर मात्र त्याने सडकून टीका केली आहे.

Published On: 

T20 World Cup 2026 Prediction : भारत vs ऑस्ट्रेलिया फायनल? मायकल क्लार्कचं मोठं विधान

वर्ल्ड कप म्हटलं की क्रिकेट चाहत्यांच्या काळजाची धडधड वाढते आणि त्यात जर भारत-पाकिस्तान मॅचचा विषय असेल तर विचारूच नका! टी-२० वर्ल्ड कपचं बिगुल वाजायला आता अवघे काही दिवस उरले आहेत. ७ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या या क्रिकेटच्या महाकुंभासाठी सगळेच सज्ज झालेत. पण स्पर्धा सुरू होण्याआधीच ऑस्ट्रेलियाचा माजी वर्ल्ड कप विनिंग कॅप्टन मायकल क्लार्क (Michael Clarke) याने एक मोठा गौप्यस्फोट करत फायनलिस्टची नावे जाहीर करून टाकली आहेत. त्याच्या या भविष्यवाणीने क्रिकेट वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

T20 World Cup 2026 Prediction

क्लार्कच्या मते, यंदाची फायनल ही साधीसुधी नसून ‘काटे की टक्कर’ असणार आहे. त्याने थेट सांगितलंय की, अंतिम सामन्यात पुन्हा एकदा भारत vs ऑस्ट्रेलिया (India vs Australia) असा सामना पाहायला मिळू शकतो. तुम्हाला आठवत असेलच की वनडे वर्ल्ड कपच्या फायनलमध्येही हेच दोन संघ आमनेसामने होते आणि तिथे भारताचा स्वप्नभंग झाला होता. त्यामुळे जर क्लार्कचं म्हणणं खरं ठरलं, तर सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) टीमला त्या पराभवाचा वचपा काढण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. विशेष म्हणजे खुद्द सूर्यानेही फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया समोर असावी, अशी इच्छा बोलून दाखवली आहे.

एकीकडे भारताचं कौतुक करताना क्लार्कने पाकिस्तानची मात्र चांगलीच शाळा घेतली आहे. १५ फेब्रुवारीला होणाऱ्या हाय व्होल्टेज भारत-पाक सामन्याबद्दल बोलताना क्लार्कने स्पष्ट शब्दांत सुनावलं. तो म्हणाला, “पाकिस्तान या मॅचमध्ये विजयाच्या जवळही पोहोचेल असं मला वाटत नाही.” भारताने या फॉरमॅटमध्ये पाकिस्तानवर जे वर्चस्व गाजवलंय, ते पाहता पाकिस्तानला आधी दडपण (Pressure) कसं हाताळायचं, हे शिकावं लागेल. क्लार्कचा हा टोला पाकिस्तानी चाहत्यांच्या नक्कीच जिव्हारी लागणारा आहे.

टीम इंडियाने २००७ मध्ये धोनीच्या आणि २०२४ मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वात कप उचलला आहे. आता T20 World Cup 2026 मध्ये तिसऱ्यांदा चॅम्पियन बनण्याची संधी आहे. पण एक गोष्ट विसरून चालणार नाही, ती म्हणजे भारताने घरच्या मैदानावर अजून एकदाही टी-२० वर्ल्ड कप जिंकलेला नाही. त्यामुळे यंदा सूर्याची सेना हा इतिहास बदलणार का? हे पाहणं रंजक ठरेल.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही