Share

भारतासाठी मोठी ‘गुड न्यूज’! डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट सांगितला प्लॅन; मोदींबद्दल म्हणाले…

दावोसमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींचे ‘अद्भुत माणूस’ म्हणत कौतुक केले आणि भारत-अमेरिका यांच्यात लवकरच मोठा व्यापार करार होणार असल्याची माहिती दिली.

Published On: 

India-US Trade Deal : ट्रम्प यांची मोठी घोषणा! मोदींचं कौतुक करत दिली गुड न्यूज

राजकारणात मैत्री आणि वैर कधी बदलेल हे कोणालाच सांगता येत नाही, आणि जेव्हा समोर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) असतील, तर भाकीत करणं अशक्यच! पण यावेळी ट्रम्प यांनी दावोस (Davos) मधून भारतीयांसाठी एक सुखद धक्का दिला आहे. जागतिक आर्थिक मंचाच्या (WEF) दौऱ्यावर असलेल्या ट्रम्प यांनी भारतीय माध्यमांशी बोलताना चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं तोंडभरून कौतुक केलंय. एवढंच नाही, तर दोन्ही देशांमध्ये लवकरच एक मोठा करार होणार असल्याचे संकेतही दिले आहेत.

Donald Trump and PM Narendra Modi

दावोसमध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल मला प्रचंड आदर आहे. ते एक अद्भुत माणूस (Wonderful Man) आहेत आणि माझे खूप चांगले मित्र आहेत.” ट्रम्प यांचं हे वक्तव्य भारतासाठी खूप महत्त्वाचं मानलं जातंय. कारण, हेच ट्रम्प होते ज्यांनी ऑगस्ट महिन्यात भारतीय वस्तूंवरील आयात शुल्कात (Tariffs) थेट ५० टक्क्यांपर्यंत वाढ केली होती. त्यावेळी दोन्ही देशांमधील संबंध तणावाचे बनले होते.

ट्रम्प यांनी स्पष्ट केलंय की, भारत आणि अमेरिकेमध्ये लवकरच एक India-US Trade Deal (व्यापार करार) होणार आहे. चर्चा आता अंतिम टप्प्यात असून लवकरच याची अधिकृत घोषणा होऊ शकते.

दुसरीकडे, या करारासाठी पडद्यामागे वेगाने हालचाली सुरू आहेत. अमेरिकेचे राजदूत सर्जियो गोर हे या कराराचा पाठपुरावा करत आहेत. तर, भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २०३० पर्यंत दोन्ही देशांतील व्यापार ५०० अब्ज डॉलर्सच्या पलीकडे नेण्याचं टार्गेट ठेवण्यात आलं आहे. यामध्ये संरक्षण आणि ऊर्जा क्षेत्रावर मोठा भर असेल. त्यामुळे आता ट्रम्प यांचा हा ‘यू-टर्न’ भारतासाठी फायद्याचा ठरणार का, हे पाहणं रंजक ठरेल.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही