Share

‘शतक हुकलं तरी चालेल, पण हे ५ रेकॉर्ड पाहा’; अभिषेक शर्माने नागपुरात घडवला इतिहास, युवराज-सूर्याही पडले मागे!

अभिषेक शर्माने ३५ चेंडूत ८४ धावा कुटल्या. शतक हुकलं तरी त्याने युवराज सिंग आणि सूर्याचे रेकॉर्ड मोडीत काढत ५ नवीन विक्रम रचले आहेत.

Published On: 

Abhishek Sharma 5 Records: शतक हुकलं पण नागपुरात 'फायर', युवराजचा रेकॉर्ड मोडला

🕒 1 min read

शतक अवघ्या १६ धावांनी हुकलं, पण त्याचं दु:ख करण्यापेक्षा अभिषेक शर्माने (Abhishek Sharma) जे काही केलंय, ते पाहून खुद्द न्यूझीलंडचे बॉलरही डोक्याला हात लावून बसले आहेत. नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात आज फक्त आणि फक्त अभिषेकच्या बॅटचा ‘आवाज’ घुमला. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या टी-२० सामन्यात अभिषेकने जे हल्लाबोल केले, त्यामुळे क्रिकेट विश्वात मोठी खळबळ उडाली आहे.

Abhishek Sharma 5 Records

३५ चेंडू आणि ८४ धावा… हे समीकरण वाचायला सोपं वाटतं, पण मैदानावर अभिषेकने जणू व्हिडिओ गेम खेळल्यासारखी फटकेबाजी केली. या खेळीत त्याचं शतक हुकलं हे खरं, पण जाता-जाता त्याने तब्बल ५ मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत.

सर्वात मोठी गोष्ट म्हणजे, अभिषेकने आपला ‘गुरू’ युवराज सिंगलाच धोबीपछाड दिली आहे. भारताकडून टी-२० मध्ये २०० पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने अर्धशतक ठोकण्याचा पराक्रम युवराजने ५ वेळा केला होता. मात्र, अभिषेकने आता ६ व्या वेळी ही कामगिरी करून युवराज सिंगचा (Yuvraj Singh) रेकॉर्ड मोडीत काढला आहे.

दुसरीकडे, टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २५ किंवा त्यापेक्षा कमी चेंडूत अर्धशतक ठोकण्याच्या शर्यतीत अभिषेक आता जगातील दादा फलंदाज ठरलाय. त्याने ८ वेळा ही किमया साधली आहे. यामुळे सूर्यकुमार यादव, फिल सॉल्ट आणि एविन लुईस (प्रत्येकी ७ वेळा) हे दिग्गज मागे पडले आहेत.

नागपुरात अभिषेकच्या नावावर झालेले इतर विक्रम: १. न्यूझीलंडविरुद्ध सर्वात वेगवान अर्धशतक (२२ चेंडू) ठोकणारा भारतीय फलंदाज. २. एका डावात न्यूझीलंडविरुद्ध सर्वाधिक ८ षटकार मारणारा पहिला आशियाई खेळाडू. ३. टी-२० क्रिकेटमध्ये ५००० धावा पूर्ण करणारा, पण १७२.५४ च्या सर्वात खतरनाक स्ट्राईक रेटने खेळणारा एकमेव फलंदाज.

अभिषेकच्या या फॉर्ममुळे वर्ल्ड कपसाठी त्याची जागा फिक्स मानली जात आहे. सामन्यात त्याने ४ चौकार आणि ४ षटकारांची आतषबाजी करत न्यूझीलंडच्या गोलंदाजीची पिसं काढली. त्यामुळे पुढच्या सामन्यात किवी संघ काय रणनीती आखतो, हे पाहणं रंजक ठरेल.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या