Share

‘जिंकायचं असेल तर त्याला टीममधून हाकला’; बाबर आझमची पुन्हा लाज काढली

मार्क वॉने सिडनी सिक्सर्सला बाबर आझमला संघातून वगळण्याचा सल्ला दिला आहे. खराब फॉर्म आणि संथ स्ट्राईक रेटमुळे बाबरवर जोरदार टीका होत आहे.

Published On: 

Mark Waugh on Babar Azam: 'जिंकायचं असेल तर त्याला बाहेर काढा', वॉ भडकला

🕒 1 min read

नावात मोठं वलय, पण कामगिरी मात्र शून्य… अशीच काहीशी अवस्था सध्या पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझमची झाली आहे. बिग बॅश लीगमध्ये (BBL) सिडनी सिक्सर्सचं थेट फायनल गाठण्याचं स्वप्न भंगलं आहे. आता त्यांच्यासमोर ‘करो या मरो’ स्थिती असतानाच, ऑस्ट्रेलियाचा दिग्गज माजी क्रिकेटपटू मार्क वॉ (Mark Waugh) याने सिडनी सिक्सर्सचे कान टोचले आहेत. मार्क वॉने थेट शब्दांत सांगितलंय की, “जर तुम्हाला पुढचा सामना जिंकायचा असेल, तर सर्वात आधी बाबर आझमला (Babar Azam) ला प्लेईंग ११ मधून बाहेरचा रस्ता दाखवा.”

Mark Waugh on Babar Azam

एलिमिनेटर फेरीत होबार्ट हरिकेन्स आणि मेलबर्न स्टार्स यांच्यातील सामन्यादरम्यान समालोचन करताना मार्क वॉने हे परखड मत मांडलं. बाबर आझम हा ‘वर्ल्ड क्लास’ खेळाडू असला तरी सध्या त्याची बॅट पुरती शांत आहे. आकडेवारी पाहिली तर कोणाचाही विश्वास बसणार नाही. बाबरने ११ सामन्यांत फक्त २०२ धावा केल्या आहेत आणि त्याचा स्ट्राईक रेट चक्क १०३.०६ इतका कमी आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ११ पैकी तब्बल ७ सामन्यांत तो दुहेरी धावसंख्याही गाठू शकला नाही.

क्वालिफायर १ मध्ये पर्थ स्कॉर्चर्सविरुद्ध तर बाबरने अक्षरशः नांगी टाकली. महत्त्वाच्या सामन्यात तो दुसऱ्याच चेंडूवर ‘झिरो’वर बाद झाला. “बाबरच्या खराब फॉर्मचा फटका पूर्ण टीमला बसतोय,” असं म्हणत मार्क वॉने संताप व्यक्त केला आहे. त्यामुळे आता क्वालिफायर २ च्या सामन्यात सिडनी सिक्सर्स व्यवस्थापन काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दुसरीकडे, बाबर फक्त फॉर्ममुळेच नाही तर आपल्या रागीट स्वभावामुळेही अडचणीत आलाय. मागच्या सामन्यात स्टीव्ह स्मिथने (Steve Smith) संथ खेळपट्टीमुळे धाव घेण्यास नकार दिला, तेव्हा बाबरचा पारा चढला होता. त्याने रागाच्या भरात आपली बॅट हवेत भिरकावली. खुद्द सिडनी सिक्सर्सचा कर्णधार मोझेस हेनरिक्सने या मोठ्या गौप्यस्फोटाला दुजोरा दिला आहे. त्यामुळे आता बाबर आझमला संघाबाहेर बसवलं तर आश्चर्य वाटायला नको.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या