Share

बीसीसीआयचा विराट-रोहितला मोठा धक्का? विराट-रोहित थेट ‘B’ ग्रेडमध्ये?

बीसीसीआय A+ श्रेणी रद्द करण्याच्या विचारात असून यामुळे विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना आर्थिक फटका बसू शकतो. त्यांना थेट ‘B’ श्रेणीत टाकले जाण्याची चर्चा आहे.

Published On: 

BCCI Central Contract Update: विराट-रोहितला धक्का? A+ श्रेणी रद्द होणार?

मुंबई – भारतीय क्रिकेटचा ‘कणा’ समजल्या जाणाऱ्या विराट कोहली आणि रोहित शर्मावर अशी वेळ येईल, असं कुणाला स्वप्नातही वाटलं नसेल. पण, बीसीसीआयच्या मुख्यालयात सध्या जे शिजतंय, ते ऐकून चाहत्यांना नक्कीच धक्का बसेल. मैदानावर भल्याभल्या गोलंदाजांची पळता भुई थोडी करणाऱ्या या दिग्गजांना आता खुद्द क्रिकेट बोर्डच ‘क्लीन बोल्ड’ करण्याच्या तयारीत आहे. बीसीसीआय आपल्या करार (BCCI Central Contract) पद्धतीत मोठा बदल करण्याचा विचार करत असून, यामुळे विराट-रोहितला थेट मोठा आर्थिक फटका बसू शकतो.

BCCI Central Contract Virat Kohli And Rohit Sharma

अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने बीसीसीआयला एक शिफारस केली आहे. यात वार्षिक करारातून ‘A+’ ही श्रेणीच रद्द करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. जर हे घडलं, तर सध्या A+ श्रेणीत असलेल्या खेळाडूंना खालील श्रेणीत जावं लागेल. धक्कादायक बाब म्हणजे, “विराट कोहली आणि रोहित शर्मा यांची रवानगी थेट ‘B’ श्रेणीत केली जाऊ शकते,” अशी चर्चा सध्या क्रिकेट वर्तुळात सुरू आहे.

पैशांचं गणित कसं बिघडणार? सध्याच्या घडीला बीसीसीआयची चार श्रेणींमध्ये वर्गवारी आहे.

A+ श्रेणी: ७ कोटी रुपये (रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा)

A श्रेणी: ५ कोटी रुपये (ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, शुभमन गिल इ.)

B श्रेणी: ३ कोटी रुपये (सूर्यकुमार यादव, यशस्वी जैस्वाल इ.)

C श्रेणी: १ कोटी रुपये (रिंकू सिंग, टिळक वर्मा इ.)

जर A+ श्रेणी बंद झाली, तर ७ कोटींवरून थेट ३ किंवा ५ कोटींवर घसरण होऊ शकते. सध्या तरी बीसीसीआयने कोणत्याही वरिष्ठ खेळाडूचा नवा करार जाहीर केलेला नाही. निवड समितीने दिलेला हा प्रस्ताव बीसीसीआयच्या अपेक्स कौन्सिलच्या बैठकीत मांडला जाईल आणि तिथेच अंतिम निर्णय होईल. त्यामुळे हा ‘बाउन्सर’ विराट आणि रोहित कसा खेळून काढतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही