🕒 1 min read
बॉलिवूडच्या चंदेरी दुनियेत पडद्यामागे नेमकं काय चालतं, हे कळायला सर्वसामान्यांना मार्ग नसतो. पण जेव्हा एखादी अभिनेत्रीच आतली गोष्ट बाहेर काढते, तेव्हा खळबळ उडतेच. भाजप खासदार आणि आपल्या रोखठोक विधानांसाठी प्रसिद्ध असलेली कंगना रणौत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी विषय राजकारण नाही, तर फॅशन वर्ल्ड आणि एका जुन्या अपमानाचा आहे. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावेळी घडलेला एक धक्कादायक प्रकार आता कंगनाने जगासमोर आणला असून, तिने थेट मसाबा गुप्तावर (नीना गुप्ता यांची लेक) निशाणा साधला आहे.
कंगनाने नुकतीच एक इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली, ज्यामध्ये तिने राम मंदिर सोहळ्यावेळी नेमकं काय घडलं (Kangana Ranaut Opens Up About Ram Mandir Event Incident) म्हणत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. अयोध्येतील ऐतिहासिक सोहळ्यासाठी कंगनाला मसाबा गुप्ताच्या कलेक्शनमधली साडी नेसायची होती. ती साडी नेसून तयार झाली आणि लखनौवरून अयोध्येच्या दिशेने निघाली सुद्धा होती.
Kangana Ranaut Ram Mandir Event Incident
पण, प्रवासात असतानाच मसाबाकडून असा एक निरोप आला की कंगनाला धक्काच बसला. मसाबाने कंगनाच्या स्टायलिस्टला थेट सांगितलं, “तिला साडी नेसू नका आणि जर नेसली असेल तर माझ्या ब्रँडचं नाव कुठेही घेऊ नका.”
याबाबत सांगताना कंगना म्हणते, “मी त्यावेळी प्रचंड अपमानित झाले, मला काय करावं सुचेना, मी अक्षरशः रडले.” आधीच साडी नेसलेली असताना आणि वेळ कमी असताना डिझायनरकडून अशी वागणूक मिळणं हे कंगनासाठी खूप क्लेशदायक होतं.
कंगनाने फक्त हा किस्साच सांगितला नाही, तर फॅशन वर्ल्डमधील दुतोंडीपणावरही बोट ठेवलंय. “काही डिझायनर्स सुरुवातीला गोड बोलून मित्र बनतात, पण नंतर अचानक तुम्हाला वाळीत टाकल्यासारखं वागतात,” अशी खंत तिने व्यक्त केली. आता मसाबाने नेमकं असं का केलं? याचं उत्तर अद्याप मिळालेलं नसलं तरी, सोशल मीडियावर या ‘साडी वॉर’ची चर्चा चांगलीच रंगली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- ठाकरेंची भाजपसोबत ‘बॅक डोअर’ डील? उद्धव ठाकरेंनी एका वाक्यात विषय संपवला; म्हणाले…
- DCP खोटं बोलले की प्रोसेस अडकली? डॉ. पाटलांना नडलेली ‘LOC’ नक्की असते तरी काय? जाणून घ्या नियम!
- “लंडनमध्ये मुलं एकटी, नोकरीही वाऱ्यावर…” डॉ. संग्राम पाटलांचा एअरपोर्टवर आक्रोश; ‘एका पोस्टसाठी अजून किती छळणार?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











