Share

DCP खोटं बोलले की प्रोसेस अडकली? डॉ. पाटलांना नडलेली ‘LOC’ नक्की असते तरी काय? जाणून घ्या नियम!

पोलीस उपायुक्तांनी सांगूनही डॉ. पाटील का अडकले? जाणून घ्या ‘लुकआऊट सर्क्युलर’ (LOC) चे नियम आणि ती रद्द करण्याची किचकट प्रक्रिया.

Published On: 

What is LOC Dr Sangram Patil

मुंबई (Mumbai LOC): तुम्ही बॅगा भरल्यात, सगळी तयारी झालीये, पण एअरपोर्टवरच्या गेटवर तुम्हाला सांगण्यात आलं “तुम्ही देश सोडून जाऊ शकत नाही”… असा धक्का बसला तर? सध्या सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या डॉ. संग्राम पाटलांच्या (Dr Sangram Patil) बाबतीत नेमकं हेच घडलंय. पोलिसांनी “तुम्ही जाऊ शकता” असं तोंडी सांगितलं, पण कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर मात्र ‘लाल दिवा’ लागला. यामागे व्हिलन ठरलंय ते एक तांत्रिक ‘शस्त्र’, ज्याचं नाव आहे LOC (Look Out Circular).

१६ जानेवारीला पोलीस उपायुक्तांनी (DCP) डॉ. पाटलांना सांगितलं होतं की चौकशी पूर्ण झाली आहे आणि ते १९ तारखेला लंडनला जाऊ शकतात. तरीही आज त्यांना एअरपोर्टवर रोखण्यात आलं. नक्की गफलत कुठे झाली? या प्रश्नाचं उत्तर सरकारी ‘प्रोसेस’मध्ये दडलेलं आहे.

What is LOC?

सोप्या भाषेत सांगायचं तर, जेव्हा एखादी व्यक्ती गुन्ह्याचा तपास टाळून परदेशात पळून जाण्याची शक्यता असते, तेव्हा पोलीस यंत्रणा ‘ब्युरो ऑफ इमिग्रेशन’ला अलर्ट करते. एकदा का तुमचं नाव सिस्टिममध्ये ‘फ्लॅग’ झालं, की तुमच्याकडे व्हॅलिड पासपोर्ट आणि व्हिसा असला तरीही, कोणत्याही विमानतळावरून तुम्हाला बाहेर पाऊल टाकता येत नाही. हे एक प्रकारचं डिजिटल ‘बॅरिकेड’ आहे.

LOC जारी करणं एका क्लिकचं काम असलं, तरी ती रद्द करणं प्रचंड किचकट आणि वेळखाऊ असू शकतं. नियमानुसार, ज्या एजन्सीने (येथे मुंबई पोलीस) LOC लावली, त्यांनीच ती काढण्यासाठी इमिग्रेशन विभागाला अधिकृतरीत्या ‘लेखी’ कळवावं लागतं. केवळ तोंडी सांगून चालत नाही.

जर १६ जानेवारीला चौकशी संपली होती, तर १९ जानेवारीपर्यंत पोलिसांनी हे पत्र इमिग्रेशनला का पाठवलं नाही? की पत्र पाठवूनही इमिग्रेशनची सिस्टिम अपडेट झाली नाही? की यामागे काही ‘राजकीय’ गेम आहे? “मी शब्द दिला होता, पण प्रोसेस अडकली” असं पोलीस म्हणतायत की जाणीवपूर्वक दिरंगाई केली, हे कोडे अद्याप सुटलेले नाही. पण या सरकारी लालफितीत (Red Tape) एका डॉक्टरचं करिअर मात्र टांगणीला लागलंय, हे नक्की.

Dr Sangram Patil Social Media Post

१४ डिसेंबर २०२५ रोजी डॉ. संग्राम पाटील यांच्या अधिकृत फेसबुक पेजवरून एक पोस्ट करण्यात आली होती. यात “मोदींच्या सेक्स स्कँडल बद्दल भाजपा अंध भक्त आणि 40 पैसेवाले सगळे चिडीचूप आहेत..” असा आक्षेपार्ह दावा करण्यात आला होता. याच पोस्टमुळे भाजपचे सोशल मीडिया संयोजक निखिल भामरे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून, त्यानुसार ‘शहर विकास आघाडी’ आणि डॉ. पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

Dr sangram patil post on narendra modi

घटनाक्रम- 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही