🕒 1 min read
मुंबई– “मी (Dr Sangram Patil) चौकशीला सहकार्य केलं, सगळी उत्तरं दिली, तरीही माझ्याशी असं का?” हा प्रश्न सध्या मुंबई विमानतळावर चर्चेचा विषय ठरलाय. १० जानेवारीला ज्या अटकेच्या नाट्याने खळबळ उडवून दिली होती, त्याचा दुसरा अंक आज (१९ जानेवारी) पुन्हा एकदा पाहायला मिळाला. डॉ. संग्राम पाटील (Dr Sangram Patil) हे निर्धास्तपणे आपल्या लंडनच्या घरी परतण्यासाठी विमानतळावर पोहोचले, पण ‘लुकआऊट सर्क्युलर’ (LOC) च्या फासात ते पुन्हा अडकले आहेत. इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी त्यांना थेट “तुम्ही देश सोडून जाऊ शकत नाही” असं सांगत रोखल्याने मोठा गोंधळ उडाला आहे.
Dr Sangram Patil LOC Issue Mumbai Airport
डॉ. पाटील हे आज सकाळी लंडनला जाण्यासाठी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आले होते. १६ जानेवारीला त्यांनी पोलिसांच्या चौकशीला हजर राहून सहकार्य केले होते. पाटील यांच्या दाव्यानुसार, त्यावेळी पोलीस उपायुक्तांनी (DCP) आणि तपास अधिकाऱ्यांनी त्यांना आश्वासन दिलं होतं की, “तुमची चौकशी पूर्ण झाली आहे, आम्ही LOC रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करत आहोत.” मात्र, आज जेव्हा ते चेक-इन साठी गेले, तेव्हा सिस्टिममध्ये त्यांच्या नावावर अद्यापही LOC ॲक्टिव्ह असल्याचं दिसून आलं.
विमानतळावर अडकल्यानंतर डॉ. पाटलांनी आपली हतबलता व्यक्त केली. ते म्हणाले, “पोलिसांनी १० तारखेलाच माझ्या सह्या घेतल्या होत्या, माझा पासपोर्ट फोटोही घेतला होता. त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की १९ तारखेला तुम्हाला जाता येईल. मात्र, आज अचानक मला रोखण्यात आलं. माझी पत्नी आणि मी दोघेही विमानतळावर ताटकळत आहोत.” वरिष्ठ पातळीवरून हे सर्क्युलर मागे घेण्याचे आदेशच आले नाहीत का? अशी शंका आता उपस्थित केली जात आहे.
युकेचे नागरिक, पण मुंबईत अडकले!
डॉ. पाटील हे युनायटेड किंगडम (UK Citizen) चे नागरिक आहेत. त्यांची दोन्ही मुलं सध्या लंडनमध्ये असून त्यांचा वैद्यकीय जॉबही तिथेच आहे. “माझं तिकडचं सगळं करिअर आणि कुटुंब वाऱ्यावर आहे. आंतरराष्ट्रीय आणि भारतीय कायद्यानुसार मला मुक्त संचाराचा अधिकार आहे, पण एका सोशल मीडिया पोस्टसाठी मला गुन्हेगारासारखी वागणूक दिली जात आहे,” असा आरोप त्यांनी केला आहे.
नेमकं काय घडलं होतं?
हे संपूर्ण प्रकरण एका फेसबुक पोस्टभोवती फिरतंय. भाजपचे सोशल मीडिया संयोजक निखिल भामरे (Nikhil Bhamre) यांनी डॉ. पाटील आणि ‘शहर विकास आघाडी’ या पेजेस विरोधात तक्रार केली होती. १४ डिसेंबर २०२५ ला पंतप्रधान आणि एका महिलेबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. याच गुन्ह्यात १० जानेवारीला पहाटे त्यांना विमानतळावरच ताब्यात घेतलं होतं. तेव्हा त्यांना फक्त नोटीस देऊन सोडलं होतं, पण आता ‘देश सोडण्यास मनाई’ केल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
सध्या पोलीस यावर काय भूमिका घेतात आणि डॉ. पाटलांना लंडनला जाण्याची परवानगी कधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
घटनाक्रम-
- लंडनहून येताच डॉ. संग्राम पाटलांना पोलिसांनी एअरपोर्टवरच गाठलं; पहाटे २ पासून चौकशी, नक्की प्रकरण काय?
- “सत्तेचा माज की कायद्याचा बडगा? ‘त्या’ एका पोस्टमुळे डॉ. संग्राम पाटलांवर गुन्हा; पवार ॲक्शन मोडवर!”
- ‘ते’ सेक्स स्कँडल आणि मोदी…; डॉ. संग्राम पाटलांची ‘ती’ वादग्रस्त पोस्ट समोर, रविकांत वरपेंचीही एन्ट्री!
- लंडनहून येताच डॉ. संग्राम पाटलांना पोलिसांनी घेरलं; विरोधकांचा सरकारला थेट इशारा, “सुटका करा, अन्यथा…”
- १५ तासांचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’ संपला; डॉ. संग्राम पाटील अखेर सुटले! ‘या’ एका गोष्टीमुळे टळली अटक?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











