Share

‘खिलाडी’च्या ताफ्यात थरार! मर्सिडीजने रिक्षाला उडवलं, अक्षय गाडीतून उतरला अन्…

अक्षय कुमारच्या ताफ्यातील गाडीचा जुहूमध्ये भीषण अपघात. मर्सिडीजच्या धडकेत रिक्षा दबली, चालक गंभीर जखमी. अक्षय सुखरूप.

Published On: 

Akshay Kumar Car Accident : जुहूमध्ये भीषण अपघात, मर्सिडीजने रिक्षा चेपली

🕒 1 min read

मुंबईच्या रस्त्यांवर रात्रीच्या वेळी वेगवान गाड्यांचा थरार तसा नवीन नाही, पण सोमवारी रात्री चक्क ‘खिलाडी’ अक्षय कुमारच्या ताफ्यासोबत जे घडलं, त्याने उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकवला. जुहू सारख्या हाय-प्रोफाईल भागात हा भीषण अपघात झाला असून, यात एका गरीबाच्या रिक्षाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे. सुदैवाने अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना सुखरूप असले तरी, या घटनेने सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणला आहे.

Akshay Kumar Car Accident

ही घटना सोमवारी रात्री नऊच्या सुमारास घडली. अक्षय कुमार घरी परतत असताना त्यांचा ताफा जुहूच्या ‘थिंक जिम’ जवळून जात होता. याच वेळी अक्षय कुमारच्या कारच्या अपघातची (Akshay Kumar Car Accident) घटना घडली. अक्षयच्या गाडीच्या मागे त्याच्या सुरक्षेसाठी असलेली एस्कॉर्ट SUV चालली होती आणि त्या SUV च्या मागे बासित खान नावाचा तरुण आपली रिक्षा चालवत होता.

अचानक मागून आलेल्या एका भरधाव मर्सिडीज कारने रिक्षाला जोरात धडक दिली. मर्सिडीजचा वेग इतका जास्त होता की, ती रिक्षा अक्षयच्या ताफ्यातील SUV वर जाऊन आदळली. मर्सिडीज चालकाने ब्रेक न लावता गाडी पुढे रेटल्याने रिक्षा दोन्ही गाड्यांच्या मध्ये सँडविच झाली आणि अक्षरशः चिरडली गेली. या धडकेत सुरक्षा रक्षकांची SUV चक्क हवेत उचलली गेली.

अपघाताचा आवाज ऐकताच अक्षय कुमार तातडीने गाडीतून खाली उतरला. त्याने परिस्थिती पाहण्याचा प्रयत्न केला, पण गर्दी आणि सुरक्षेचे कारण देत त्याच्या टीमने त्याला तिथून तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवलं. दुसरीकडे, या अपघातात रिक्षाचालक बासित खान गंभीर जखमी झाला आहे.

त्याचा भाऊ समीर खान याने अत्यंत संतापजनक प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला, “माझ्या भावाची अवस्था अतिशय गंभीर आहे. आम्ही गरीब माणसं आहोत, आम्हाला पोलिसांकडून ठोस मदत मिळत नाहीये. त्या मर्सिडीजवाल्याने आमच्या नुकसानीची भरपाई द्यावी आणि उपचाराचा खर्च करावा.”

जुहू पोलिसांनी तत्परता दाखवत मर्सिडीज जप्त केली असून चालकाला ताब्यात घेतलं आहे. सध्या सोशल मीडियावर या अपघाताचा व्हिडीओ व्हायरल होत असून, मर्सिडीज चालकाच्या निष्काळजीपणावर नेटकरी संताप व्यक्त करत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अद्याप अधिकृत एफआयआरची प्रत समोर आलेली नसली तरी, पोलीस कसून तपास करत आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही