🕒 1 min read
मुंबई (Mumbai): विचार करा, सात-समुद्रापार तुमची लहान मुलं घरात एकटीच तुमची वाट बघतायत… तुमची वर्षानुवर्षांची कष्टाची नोकरी धोक्यात आहे… आणि इथे आपल्याच मायदेशात तुम्हाला एखाद्या गुन्हेगारासारखं एअरपोर्टवर तासनतास अडवून ठेवलं जातंय. ही कोणतीही फिल्मी कथा नाही, तर ही वेदनादायी परिस्थिती सध्या डॉ. संग्राम पाटील (Dr Sangram Patil) अनुभवत आहेत. “माझं तिकडे सगळं वाऱ्यावर आहे,” या त्यांच्या एका वाक्याने आज अनेकांचे काळीज पिळवटून टाकले.
१० जानेवारीच्या घटनेनंतर डॉ. पाटील आज (१९ जानेवारी) आपल्या कुटुंबाकडे, लंडनला परतण्यासाठी विमानतळावर आले होते. मात्र, नियतीचा खेळ आणि कायद्याचा बडगा आड आला. इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी ‘लुकआऊट सर्क्युलर’ (LOC) चे कारण पुढे करत त्यांना पुन्हा रोखले. डॉ. पाटील हे युनायटेड किंगडम (UK) चे नागरिक असून तिथे वरिष्ठ डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना ड्युटीवर हजर राहणे अपेक्षित होते, पण ते मुंबईतच अडकले आहेत.
डॉ. पाटील यांनी आपली व्यथा मांडताना सांगितलं की, “मी १६ तारखेलाच पोलिसांच्या चौकशीला हजर राहून सर्व सहकार्य केलं. खुद्द डीसीपींनी आश्वासन दिलं होतं की आता तुम्हाला अडचण येणार नाही. पण आज पुन्हा मला आणि माझ्या पत्नीला रोखण्यात आलं. माझी मुलं लंडनमध्ये एकटी आहेत, माझा जॉब जाण्याची भीती आहे. एका फेसबुक पोस्टची एवढी मोठी शिक्षा?” हा सवाल त्यांनी यंत्रणेला विचारला आहे.
रुग्णसेवा करणाऱ्या हातांना अशी वागणूक मिळणे कितपत योग्य आहे? सोशल मीडियावर आता हाच प्रश्न विचारला जातोय. डॉ. पाटलांचे समर्थक आणि सामान्य नागरिक या कारवाईला ‘सुडबुद्धी’ म्हणत संताप व्यक्त करत आहेत. “डॉक्टरांना सन्मान द्या, गुन्हेगार समजू नका,” अशा प्रतिक्रियांचा सध्या सोशल मीडियावर पाऊस पडत आहे.
एका बाजूला ‘विश्वगुरू’ होण्याच्या गप्पा आणि दुसऱ्या बाजूला आपल्याच मातीतील एका डॉक्टरची अशी अडवणूक, यामुळे राजकारण तापले आहे. आता पोलीस माणुसकी दाखवून त्यांना लंडनला जावू देणार का? की कायद्याच्या जंजाळात त्यांचे करिअर भरडले जाणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
घटनाक्रम-
- पोलिसांनी शब्द फिरवला? लंडनला निघालेल्या डॉ. संग्राम पाटलांना पुन्हा रोखलं; एअरपोर्टवर हायव्होल्टेज ड्रामा!
- लंडनहून येताच डॉ. संग्राम पाटलांना पोलिसांनी एअरपोर्टवरच गाठलं; पहाटे २ पासून चौकशी, नक्की प्रकरण काय?
- “सत्तेचा माज की कायद्याचा बडगा? ‘त्या’ एका पोस्टमुळे डॉ. संग्राम पाटलांवर गुन्हा; पवार ॲक्शन मोडवर!”
- ‘ते’ सेक्स स्कँडल आणि मोदी…; डॉ. संग्राम पाटलांची ‘ती’ वादग्रस्त पोस्ट समोर, रविकांत वरपेंचीही एन्ट्री!
- लंडनहून येताच डॉ. संग्राम पाटलांना पोलिसांनी घेरलं; विरोधकांचा सरकारला थेट इशारा, “सुटका करा, अन्यथा…”
- १५ तासांचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’ संपला; डॉ. संग्राम पाटील अखेर सुटले! ‘या’ एका गोष्टीमुळे टळली अटक?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











