Share

ठाकरेंची भाजपसोबत ‘बॅक डोअर’ डील? उद्धव ठाकरेंनी एका वाक्यात विषय संपवला; म्हणाले…

भाजपसोबतच्या गुप्त चर्चेच्या बातम्या उद्धव ठाकरेंनी फेटाळल्या असून, संजय राऊतांनी “महापौर अदानीच ठरवणार” म्हणत भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.

Published On: 

Devendra Fadnavis, Uddhav Thackeray

मुंबई- राजकारणात सकाळचा चहा संपेपर्यंत काय नवीन समीकरणं जुळतील, हे सांगता येत नाही. सध्या मुंबई महापौरपदावरून (Mumbai Mayor Election) भाजप आणि शिंदे गट यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. ‘महापौर आमचाच’ असा दावा दोन्ही बाजूने केला जातोय. पण या ‘हाय व्होल्टेज’ ड्रामामध्ये अचानक एका तिसऱ्याच अँगलने खळबळ उडवून दिली. एका आघाडीच्या वृत्तपत्राने दावा केला की, भाजप आणि उद्धव ठाकरे यांच्यात पडद्यामागे गुप्त चर्चा झाली असून, ठाकरे गटाचे नगरसेवक निवडणुकीत गैरहजर राहून भाजपला मदत करतील. या बातमीमुळे शिंदे गटाच्या गोटातही अस्वस्थता पसरली होती.

Uddhav Thackeray on Mumbai Mayor Election

ठाकरेंनी चर्चा फेटाळल्या, सस्पेन्स संपवला!

मात्र, Uddhav Thackeray यांनीच मैदानात उतरून या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. “आमची भाजपसोबत कोणतीही चर्चा झालेली नाही आणि अशा बातम्यांमध्ये काहीच तथ्य नाही,” असे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केल्याने भाजपच्या आशेवर पाणी फेरलं गेलंय. ठाकरे भाजपला मदत करणार, या वावड्या होत्या हे आता स्पष्ट झालंय.

“महापौर अदानीच ठरवणार…”

दुसरीकडे, संजय राऊत यांनी आपल्या खास शैलीत भाजपवर ‘हल्लाबोल’ केला. ते म्हणाले, “आम्ही सूत्रांच्या बातम्यांवर विश्वास ठेवत नाही. मुंबईचा महापौर कोणाला करायचं, हे शेवटी भाजप आणि गौतम अदानीच ठरवतील.” तसेच, मुंबईत देवेंद्र फडणवीसांचा माणूस महापौर होऊ नये, यासाठी दिल्लीतून फिल्डिंग लावली जात असल्याचा खळबळजनक दावाही राऊतांनी केला.

शिंदेंचे नगरसेवक हॉटेलमध्ये इकडे या वावड्यांमुळे एकनाथ शिंदे मात्र अलर्ट झाले आहेत. आपले नगरसेवक फुटू नयेत किंवा कुणाच्या संपर्कात येऊ नयेत, म्हणून त्यांनी तातडीने नवनिर्वाचित नगरसेवकांची रवानगी एका हॉटेलमध्ये केली आहे. शिंदे गटाचे काही नगरसेवक ठाकरेंच्या संपर्कात असल्याची चर्चा ‘मातोश्री’च्या परिसरात दबक्या आवाजात सुरू आहे. त्यामुळेच आता महापौरपदाची निवडणूक ही केवळ आकड्यांची नाही, तर ‘निष्ठा’ टिकवण्याची लढाई बनली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही