रिॲलिटी शोमध्ये टास्क जिंकण्याचा आनंद किती महागात पडू शकतो? नेटफ्लिक्सच्या ‘लॉकअप २’ (Lock Upp 2) मध्ये सध्या असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. टास्क जिंकल्याच्या आनंदात ५२ वर्षीय अभिनेते राम कपूर यांनी असं काही केलं, ज्यामुळे त्यांचीच को-कंटेस्टंट श्रेया कालराचा पारा आता सातव्या आकाशाला भिडला आहे.
गेल्या आठवड्यात श्रेयाने कंट्रोलरच्या भूमिकेत सलग तीन टास्क जिंकत राम कपूर (Ram Kapoor) यांना एलिमिनेशनपासून वाचवले. याच उत्साहाच्या भरात राम कपूर यांनी श्रेयाच्या गालावर आणि कपाळावर वारंवार किस केले. त्यावेळी शांत राहिलेली श्रेया आता मात्र चांगलीच भडकली असून, तिने थेट राम कपूर यांच्या सीनिअरिटीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत शोमध्ये खळबळ उडवून दिली आहे.
Lock Upp 2 Ram Kapoor Controversy
नुकत्याच समोर आलेल्या एका एपिसोडमध्ये श्रेयाने आपला सगळा राग शिल्पा शिंदेसमोर व्यक्त केला. संतापलेली श्रेया म्हणाली, “मी तुझ्यासाठी तीन टास्क जिंकले, पण तू माझ्या पाठीशी उभा राहायला घाबरतोस. अशा घाबरट माणसाचा मी आदर का करू? अशा सीनिअरिटीवर थू आहे.”
“जर फराह मॅडमने मला विचारलं, तर मी स्पष्ट सांगेन. पुढच्या वेळी त्याने मला किस करण्याचा प्रयत्न केला, तर मी थेट त्याचा चेहरा पकडून सांगेन की, माझे स्वतःचे वडीलसुद्धा मला इतक्या वेळा किस करत नाहीत, त्यामुळे तुमच्या मर्यादा ओळखा,” असा सज्जड दमच श्रेयाने दिला आहे. यावेळी बोलताना तिने शिवांगीच्या टास्कवेळीही राम कपूर कसे अवाजवी जवळ गेले होते, याची आठवण करून दिली.
दुसरीकडे, सोशल मीडियावरही हा वाद चांगलाच तापला आहे. दोन मुलांचा बाप असलेल्या राम कपूरने सार्वजनिक ठिकाणी वावरताना भान ठेवायला हवे, असे म्हणत नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
विशेष म्हणजे, शोच्या प्रीमियरलाही त्यांनी स्टेजवरच एकता कपूरला किस केले होते. त्यामुळे आता या नव्या वादावर वीकेंडला फराह खान किंवा स्वतः राम कपूर काय भूमिका घेतात, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- सूपमध्ये झुरळ, फ्रिजमध्ये धक्कादायक प्रकार; तुकाराम मुंडेंचा नागपुरात मोठा दणका!
- हातात संविधान आणि थेट ट्रकवर; प्रकाश राज यांनी दिल्ली का दणाणून सोडली?
- ‘आमचं सरकार जनतेने निवडलंय, ते कसं चालवायचं हे…..’; कंगना राणौत थेट विरोधकांवर कडाडली!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










