Share

हातात संविधान आणि थेट ट्रकवर; प्रकाश राज यांनी दिल्ली का दणाणून सोडली?

सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ CJP च्या आंदोलनात अभिनेते प्रकाश राज यांनी सहभाग घेत, थेट ट्रकवर उभे राहून तरुणांमध्ये जोश भरला.

Published On: 

Prakash Raj CJP Protest giving speech from truck roof with constitution

सोनम वांगचुक यांना पोलिसांनी जबरदस्तीने रुग्णालयात दाखल केल्यानंतर दिल्लीत अचानक तरुणांचा उद्रेक का झाला? संसदेच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जंतरमंतरवर असा एक चेहरा दिसला, ज्याने स्वतःचे सर्व स्टारडम बाजूला ठेवून थेट रस्त्यावरची लढाई सुरू केली आहे.

नेहमीच रोखठोक भूमिका घेणारे अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj) यांनी चक्क दिल्लीतील कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) आंदोलनात उडी घेतली आहे. काल रात्रीपासूनच त्यांनी जंतरमंतरवर ठाण मांडले असून, आज एका ट्रकच्या छतावर उभं राहून त्यांनी सरकारविरोधात जोरदार रणशिंग फुंकले.

Prakash Raj on CJP Protest

सोनम वांगचुक यांचे आंदोलन मोडीत काढल्यानंतर CJP नेते अभिजीत दीपके यांनी उपोषण सुरू करत सरकारचा निषेध नोंदवला. या कारवाईमुळे संतप्त झालेले तरुण मोठ्या संख्येने जंतरमंतरवर धडकले आहेत.

त्यामुळेच तरुणांचा आवाज बनण्यासाठी प्रकाश राज तिथे पोहोचले. विशेष म्हणजे काल रात्री कोणताही बडेजाव न मिरवता, एका सामान्य नागरिकाप्रमाणे ते स्टेजवरच झोपले होते. आज सकाळी जेव्हा सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली घटनास्थळी आल्या, तेव्हा परिस्थिती आणखी तापली.

तरुणांशी संवाद साधण्यासाठी गीतांजली एका ट्रकवर उभ्या राहिल्या. त्यांच्यासोबत प्रकाश राज यांनीही थेट ट्रकच्या छतावर चढून तरुणांना संबोधित केले. हातात भारताचे संविधान उंचावत प्रकाश राज यांनी अत्यंत आक्रमक शैलीत सरकारवर हल्लाबोल केला.

त्यांच्या या कृतीमुळे आणि खणखणीत भाषणामुळे आंदोलक तरुणांमध्ये एक वेगळाच जोश पाहायला मिळाला. एकीकडे दडपशाहीचा आरोप होत असताना, प्रकाश राज यांच्या उपस्थितीमुळे या आंदोलनाला आता वेगळेच बळ मिळाले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही