Share

राम कपूरचा ‘लॉकअप’मध्ये धक्कादायक प्रताप; थेट २५ वर्षांनी लहान इन्फ्लुएंसरला केलं किस!

‘लॉकअप’मध्ये ५२ वर्षीय राम कपूरने इन्फ्लुएंसर लैलाला लिप किस केल्याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला असून, त्याच्या या कृत्यावर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

Published On: 

Ram Kapoor Trolling actor Ram Kapoor kissing Laila in Lock Upp reality show

वयाच्या बावन्नव्या वर्षी टीव्हीचा एक अत्यंत संस्कारी आणि लोकप्रिय चेहरा अचानक रिॲलिटी शोमध्ये असं काही करेल, याचा कुणी विचार तरी केला होता का? नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारा अभिनेता राम कपूर (Ram Kapoor) सध्या मात्र एका अत्यंत धक्कादायक कारणामुळे नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला आहे.

नेटफ्लिक्सवर सुरू असलेल्या ‘लॉकअप’ (Lock Upp) या रिॲलिटी शोमध्ये रामने चक्क स्वतःपेक्षा २५ वर्षांनी लहान असलेल्या इन्फ्लुएंसरला, वरुण यादव ऊर्फ लैलाला (Laila Influencer) थेट लिप किस केल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत असून, रामच्या या वागणुकीवर जोरदार टीका सुरू झाली आहे.

Ram Kapoor Trolling

‘लॉकअप’च्या एका भागात गार्डन एरियामध्ये काही स्पर्धकांच्या गप्पा रंगल्या होत्या. त्यावेळी राम कपूरने शेजारी बसलेल्या लैलाला अचानक जवळ घेतलं आणि थेट तिच्या गालावर किस केलं. पण तो तिथेच थांबला नाही, तर त्यानंतर त्याने चक्क लैलाला लिप-टू-लिप किस केल्याचं कॅमेऱ्यात कैद झालं आहे.

रामने खरंच किस केलं की तसं फक्त भासवलं? यावर अजून अधिकृत पुष्टी नाही. पण कॅमेऱ्यात दिसणाऱ्या या कृतीमुळे तिथे उपस्थित असलेली गोविंदाची पत्नी सुनीता आहुजासुद्धा चांगलीच हादरून गेली. तिच्या चेहऱ्यावरचं आश्चर्य आणि धक्का स्पष्ट दिसत होता.

दुसरीकडे, काही दिवसांपूर्वीच राम कपूरने ‘लग्नात चीटिंग करणे सामान्य आहे’ असं अत्यंत वादग्रस्त विधान करून चर्चेला तोंड फोडलं होतं. नातं तुटण्यापेक्षा ते टिकवणं महत्त्वाचं असून, नात्यात कोणतीही चूक कायमस्वरूपी ‘डील ब्रेकर’ असू शकत नाही, असं त्याचं म्हणणं होतं.

त्याच्या त्या विधानानंतर आता घडलेल्या या नव्या प्रतापामुळे नेटकऱ्यांचा संताप अनावर झाला आहे. “रामचं मानसिक संतुलन बिघडलंय” अशा संतप्त प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत.

फराह खान आणि रितेश देशमुख होस्ट करत असलेल्या या शोमध्ये आता पुढे काय होणार आणि या प्रकरणावर राम कपूर स्वतः काय उत्तर देणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही