Share

राज ठाकरेंचा भाजपाला इशारा; म्हणाले- “भविष्यात तुम्हालाही याच त्रासाला सामोरं जावं लागेल”

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षफुटीच्या राजकारणावर टीका करत भाजपाला भविष्यात याच प्रकारच्या राजकीय संकटाचा सामना करावा लागू शकतो, असा इशारा दिला आहे.

Published On: 

Raj Thackeray

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठ्या राजकीय घडामोडी सुरू आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (Shivsena) गटातील सहा खासदारांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर आमदार सचिन अहिर यांनीही शिंदे गटाकडून विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी अर्ज दाखल केला. या घडामोडींमुळे उद्धव ठाकरे गटाला सलग धक्के बसत असल्याची चर्चा सुरू आहे. राज्यातील या राजकीय उलथापालथीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पत्रकार परिषदेत भाष्य करत सध्याच्या राजकीय परिस्थितीवर जोरदार टीका केली. राज ठाकरे यांनी भाजपावर (BJP)निशाणा साधत म्हटले की, “आता भाजपाला जो त्रास होणार आहे, तो त्यांनी बघत राहावा. नरेंद्र मोदींमुळे (Narendra Modi) सध्या भाजपा टिकून आहे.”

राज ठाकरे काय म्हणाले?

राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रात पुढील काही वर्षांत निवडणुका होणार आहेत, मात्र आतापासूनच राजकीय वातावरण तापले आहे. सध्या देशात सुरू असलेले राजकारण चांगले नसून ते घाणेरड्या पातळीवर जात आहे. सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीही आलेले नाही. आज घेतले जाणारे निर्णय भविष्यात चुकीचा पायंडा ठरू नयेत, याचा विचार राजकीय पक्षांनी करायला हवा. सत्ता येते आणि जाते. मात्र देश आणि महाराष्ट्रातील राजकारण कोणत्या दिशेने जात आहे, याचा विचार करणे गरजेचे आहे.

भाजपाला भविष्यात त्रास होईल  

फोडाफोडीच्या राजकारणावर टीका करत राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रात सुरू असलेले पक्ष फोडण्याचे राजकारण अत्यंत चुकीचे आहे. “उद्या सत्ता गेल्यानंतर भारतीय जनता पक्षालाही (BJP) अशाच प्रकारचा त्रास होईल. तेव्हा भाजपा काय करेल? आपण काय करत आहोत आणि कुठपर्यंत जायचे आहे, याला काही मर्यादा आहेत का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

“भाजपामध्येही विरोधक तयार होतील”

राज ठाकरे पुढे म्हणाले की, इतिहास पाहिला तर अनेक वेळा सत्ताधाऱ्यांनी विरोधक संपवण्याचा प्रयत्न केला, पण त्यातून त्यांच्याच पक्षात विरोधक निर्माण झाले. हीच प्रक्रिया आता भाजपामध्ये सुरू झाल्याचे दिसत आहे. भविष्यात पक्षातील अंतर्गत विरोधकांमुळे भाजपाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.

“भाजपा नरेंद्र मोदींमुळे टिकून आहे”

पुढे राज ठाकरे म्हणाले की, सध्या भाजपा फक्त नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे टिकून आहे. अशा परिस्थितीत सुरू असलेले राजकारण भाजपासाठीही अडचणीचे ठरू शकते. शिवसेनेतील खासदार फोडण्याच्या मुद्द्यावर त्यांनी सवाल उपस्थित केला की, जर हे खासदार भाजपामध्ये गेले नाहीत तर त्यांना वेगळा गट का तयार करावा लागला? टीएमसीच्या खासदारांबाबतही असाच प्रश्न उपस्थित करत राज ठाकरे यांनी सध्याच्या राजकीय रणनीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही