Share

पृथ्वीराज चव्हाणांना म्हातारपणी वेड लागलं की काय? भाजपचा घणाघात

काँग्रेस पक्षाचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या दाव्यावर भाजप प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी जोरदार पलटवार केला.

Published On: 

Ram Kulkarni attacks Prithviraj Chavan

दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) काँग्रेस पक्षात सामील होऊ शकले असते, या विधानावरून भाजपने काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) त्यांच्यावर जोरदार प्रतिहल्ला चढवला आहे.

भाजपचे प्रवक्ते राम कुलकर्णी (Ram Kulkarni) यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या म्हतारपणावरच वार केला आहे. वाढत्या वयाचा उल्लेख करत त्यांच्यावर उपरोधिक टीका केली. आता भाजपच्या या टीकेला पृथ्वीराज चव्हाण काय प्रत्युत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Ram Kulkarni attacks Prithviraj Chavan

राम कुलकर्णी यांनी म्हटले की, “राज्याचे माजी मुख्यमंत्री काँग्रेस पक्षाचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांना म्हातारपणी वेड लागलं की काय? मरणोत्तर एखाद्या राजकीय नेत्याची खोटेपणाची वावटळ उठवायची, हे फक्त काँग्रेस वालेच करू शकतात. काँग्रेसकडे काही मुद्दे नाही, म्हणून हे आरोप सुरू आहेत. म्हातारपणी प्रसिद्धी मिळवण्याची पृथ्वीराज चव्हाण यांचा हा खटाटोप आहे.”

दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी आपले संपूर्ण आयुष्य भाजपसाठी (BJP) झिजवले आहे. मुंडे साहेबांनी हाडाची काडं करून चांदा ते बांधा असा भाजप पक्ष वाढवला. पृथ्वीराज चव्हाण यांच्या खोट्या वावटळीचा निषेध असल्याचे राम कुलकर्णी यांनी म्हटले.

पुढे राम कुलकर्णी यांनी सांगितले की, “मी गोपीनाथ मुंडे यांच्या हाताखाली ३५ वर्षे काम केलेला कार्यकर्ता आहे. ते एकच म्हणायचे की, माझा प्राण गेला की माझा देह भारतीय जनता पक्षाच्या झेंड्यांमध्येच बांधला पाहिजे.” पृथ्वीराज चव्हाण यांना पक्ष विचारत नाही. पक्षाने त्यांना बाजूला टाकले आहे. त्यांना हे शोभत नाही.” असाही टोला राम कुलकर्णी यांनी लगावला आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही